शुभा प्रभू साटम

दिवाळी झाली. घरात फराळाने खच्चून भरलेले डबे, मिठाई असतेच. सगळीच काही संपते असे नव्हे. दिवाळीच्या दिवसात अगदी उत्साहाने केलेला हा फराळ दिवाळीनंतर मात्र डब्यातच रेंगाळतो. या उरलेल्या फराळाचाच एक मस्त पदार्थ तयार करूयात.

साहित्य

उरलेला कोणताही तिखट फराळ, चाट मसाला, उकडलेला बटाटा, तेल.

कृती

उरलेला कोणताही कोरडा तिखट फराळ मिक्सरमधून बारीक करून घ्या. अगदी छान कोरडा भुगा व्हायला हवा. आता उकडलेले बटाटे त्यात कुस्करून घाला थोडा चाट मसाला घाला आणि घट्टसर मिश्रण मळून घ्या. त्याचे छोटे छोटे पॅटीस तव्यावर तेल घालून परता. मसाले आणि मीठ थोडं काळजीपूर्वक घाला कारण फराळाच्या पदार्थात आधीच मीठ-मसाला असतो. या पलीकडे आवडीप्रमाणे कोणतेही आवडीचे जिन्नस मिसळून हे पॅटीस करू शकता.