टेस्टी टिफिन : – शुभा प्रभू साटम

साहित्य : १ वाटी तांदूळ,  जाडसर रवा, काळी/जिरे, लाल सुकी मिरची, कोणतीही डाळ, राइ, हिंग, कढीपता, उडीदडाळ, चणाडाळ, आले हिरवी मिरची, मीठ

कृती : १वाटी तांदूळ घेवून फडक्यावर पसरून, कोरडे करून घ्यावे,नंतर त्याचा जाडसर रवा मिक्सरमधून काढून घ्यावा.आवडत असल्यास त्यात तेव्हाच काळी मिरी/जिरे,लाल सुकी मिरची घालावी. मिश्रण भरड हवे, त्याच्या निम्मे कोणतीही डाळ घ्यावी. कुकरमध्ये राई, हिंग, कढीपत्ता, उडीद, चणाडाळ, आले, हिरवी मिरची यांची फोडणी करून ,त्यात २ वाटय़ा पाणी घालावे. त्याला उकळी आली की तांदूळ आणि डाळ घालूत, चवीनुसार मीठ व ढवळून किंचित साखर घालावी. कूकर बंद करून दोन शिटय़ा घ्याव्यात. शिजल्यानंतर तूप घालून चटणीसोबत ते ‘सव्‍‌र्ह’ करावे. या उपम्यात भाज्या टाकून तो अधिक पौष्टिक व चवदारही करता येतो.