|| अमित सामंत 

बुडापेस्टची खाऊगल्ली वॅसी स्ट्रीटवर फिरताना अनेक रेस्टॉरंट्सच्या बाहेर चिकन पाप्रिकाचे बोर्ड लावले होते. त्यावर लावलेले चिकन पाप्रिकाची छायचित्र पाहून खाण्याचा मोह आवरता आला नाही. चिकन पाप्रिका हा पारंपरिक हंगेरीयन आहारातला महत्त्वाचा पदार्थ आहे. यातील पाप्रिका हा आपल्याकडील मसाल्यासारखा जिन्नस तिथल्या अनेक पदार्थात वापरला जातो. पाप्रिका हा मूळचा मेक्सिकन पदार्थ ढोबळी मिरची सुकवून त्यापासून तयार केला जातो. अशा सुकवलेल्या ढोबळी मिरचीच्या माळा बुडापेस्टच्या मसाल्याच्या दुकानांत दिसतात. मेक्सिकोतून हा पदार्थ मध्य युरोपात आणि तिथून तुर्काबरोबर सोळाव्या शतकात हंगेरीत आला. तुर्कानी बुडापेस्टमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली आणि त्यानंतर पाप्रिकाने हंगेरीयन पारंपरिक जेवणात शिरकाव केला.

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

चिकन पाप्रिका हा पदार्थ आपल्या चिकन मसालासारखा दिसतो. पण चवीला गोडूस असतो. कारण पाप्रिका लाल दिसत असली तरी तिखट नसते. चिकन पाप्रिका तयार करताना चिकनचे तुकडे तेलात परतवून त्यानंतर त्याच तेलात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो परतवून त्यात पाप्रिका टाकला जातो. हे मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात चिकनचे तळलेले तुकडे टाकून शिजवले जातात.