|| स्वादिष्ट सामिष : दीपा पाटील

साहित्य

  • पाव किलो कुपा मासा
  •  २ उकडलेले बटाटे
  • २ चमचे तळलेला कांदा
  • २ हिरव्या मिरच्या
  • २ चमचे आले-लसूण वाटलेले
  • १ चमचा लाल मिरची पूड
  • अर्धा चमचा काळीमिरी पूड
  • अर्धी वाटी कोथिंबीर
  •  अर्धी वाटी ब्रेडक्रम्स
  • २ अंडी, मीठ, तेल.

कृती

कुपा मासा साफ करून घ्यावा. त्यानंतर ५ मिनिटे तो पाण्यात उकळवून त्याचे काटे वेगळे काढून घ्यावेत. म्हणजे आता त्यात एकही काटा राहणार नाही. यानंतर उकडलेला बटाटा, कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, वाटलेले आले-लसूण, लाल मिरची पूड, काळीमिरी पूड आणि चवीपुरते मीठ हे एकत्र करून त्यात उकळवून काटे काढलेला कुपा मासा घालावा. सर्व पदार्थ कुस्करून एकमेकांत मिसळून घ्यावे. त्याच्या गोल टिक्की बनवाव्यात. अंडे फोडून त्यात या टिक्की बुडवून घ्याव्यात. त्यानंतर ब्रेडक्रम्समध्ये घोळवाव्या आणि तेलात तळून किंवा परतून घ्याव्यात. सॉससोबत खाव्यात.