12 December 2019

News Flash

सिमला मिरची सूप

लाल सिमला मिरची आणि टोमॅटो आगीवर छान खरपूस भाजून घ्यावे. लसूणही अशाच प्रकारे भाजावी.

(संग्रहित छायाचित्र)

टेस्टी टिफिन: शुभा प्रभू साटम

साहित्य

लाल सिमला मिरची, टोमॅटो, लसूण, ड्राय हब्र्ज, मीठ, मिरपूड, साखर, लोणी.

कृती

लाल सिमला मिरची आणि टोमॅटो आगीवर छान खरपूस भाजून घ्यावे. लसूणही अशाच प्रकारे भाजावी. त्याची निघतील तितकी साले काढून ते ब्लेंडरमध्ये एकजीव करावे. यानंतर पाणी, ड्राय हब्र्ज, मीठ, मिरपूड, साखर घालून एक उकळी काढून घ्यावी. लोणी घालून प्यायला घ्यावे. व्हेजिटेबल स्टॉक असल्यास पाण्याऐवजी तो वापरू शकता. जास्त तिखट सूप हवे असेल तर लाल मिरची किंवा मिरची पूड घालावी.

First Published on November 13, 2019 1:05 am

Web Title: recipe simla soup akp 94
Just Now!
X