|| रचना पाटील

साहित्य

३ वाटय़ा सोललेले वाल, २ कांदे, २ मोठा चमचा ओलं खोबरं, ४ लाल ओल्या मिरच्या, २ चमचा लाल तिखट, ४-५ चिंच, गुळाचा तुकडा, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, ५-६ कढीपत्त्याची पाने, १ मोठा चमचा तेल, कोथिंबीर.

कृती

लोखंडी कढईत तेल टाकून त्यात जिरे व मोहरी टाका. मोहरी तडतडली की साबूत लाल मिरच्या घाला. त्यावर कांदा चिरून टाका. कांदा परतला की लाल तिखट टाका. वाल टाकून परता. झाकून ठेवा आणि वाफेवर शिजू द्या. वाल शिजत आले की  त्यात मीठ, चिंच, गूळ, ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाका.