25 January 2020

News Flash

नक्कल‘कार’

एखादी वस्तू लोकप्रिय झाली की काही काळातच तिची नक्कल बाजारात दिसू लागते.

|| व्हिंटेज वॉर : वैभव भाकरे

तुम्ही माउंटन लायटनिंग, सनबक्स कॉफी, पॉली स्टेशन ३, आदिदोस ही नावे कधी ऐकली आहेत का? कदाचित तुम्ही या उत्पादनाचे प्रेरणास्रोत माउंटन डय़ू, स्टारबक्स कॉफी, प्ले स्टेशन ३, आदिदास या ब्रँडची नावे ऐकली असतील. मोठमोठय़ा ब्रॅण्डच्या नक्कल असणाऱ्या वरील सर्व कंपन्या चिनी आहेत. या कंपन्या हाती लागणाऱ्या कोणत्याही चांगल्या उत्पादनाची नक्कल करून बाजारात विकायला सुरुवात करतात. मोटार क्षेत्रावरही यांची मेहेरनजर आहेच. चीनमधील काही कंपन्या, तर परदेशी गाडय़ांची हुबेहूब नक्कल करण्यासाठीच प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा हक्कच्या जटिल नियमावलीमुळे एखाद्या कार डिझायनरला त्याच्या डिझाइनची नक्कल आढळली तरी तो त्याबाबत काही करू शकत नाही.

एखादी वस्तू लोकप्रिय झाली की काही काळातच तिची नक्कल बाजारात दिसू लागते. अशा नक्कलकार कंपन्या मोबाइल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बूट, घडय़ाळ, कपडय़ांपासून चष्म्यांपर्यंत सर्वच गोष्टी विकतात. असे करणाऱ्यांचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारातले मूळ राचनेतून प्रेरणा घेऊन त्यात थोडेफार बदल करून जगासमोर मांडतात. आणि दुसरऱ्या प्रकारातले कशाचीही तमा न बाळगता दुसऱ्याचे उत्पादन जशेच्या तशे घेऊन त्यावर आपले नाव लावून जागासमोर आणतात. मोटार क्षेत्रातही अशा प्रकारच्या गोष्टी काही नवीन नाहीत. विशेष म्हणजे बनावट उत्पादनांसाठी कुख्यात असणाऱ्या चीनमध्येच असे प्रकार मोठय़ा प्रमाणात आढळून आले आहेत.

जिली ‘जीई’ (रोल्स रॉयस फँटम)

या गाडीच्या बम्परवरचे नाव जर तुम्ही काढले तर तुम्हाला वाटेल की तुम्ही रोल्स रॉयस फँटम पाहात आहात. बोनेटवरील फ्लयिंग लेडी ते रेडिएटरची रोल्स रॉयससारखी पारंपरिक ठेवणं. रोल्स रॉयसची ओळख म्हणून प्रचलित असलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला या गाडीत आढळून येतील. पण ही रोल्स रॉयस नाही, या गाडीचे नाव आहे जिली ‘जीई.’ गाडीची अंतर्गत रचनादेखील मूळ रोल्स रॉयसप्रमाणे अगदी आलिशान आहे. कुठे फरक आढळलाच तर तो आहे गाडीच्या ताकदीमध्ये, जिली या गाडीला ३.५ लिटरचे व्ही ६ इंजिन आहे, ज्याची सर्वाधिक वेग १७७ किमी एवढा आहे. तर रोल्स रॉयसमध्ये ६.७४ लिटरचे व्ही १२ इंजिन असून या गाडीचा वेग २४१ किमीपर्यंत मर्यादित ठेवण्यात येतो.

डियाब्लो व्हीटी (लॅम्बॉर्गिनी डियाब्लो )

या कारच्या निर्मितीची कथा रोचक आहे. सुपरकारचे दोन चाहत्यांना खरीखुरी लॅम्बॉर्गिनी विकत घेणे शक्य नसल्याने त्यांनी स्वत:च ती गाडी तयार करायचे ठरवले. वांग यु आणि ली लिन्टाओ या दोघांनी ब्रिटन आणि जर्मनीमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. चीनमध्ये परतल्यावर स्वत:ची डियाब्लो तयार करण्याचे त्यांनी ठरवले. गाडीच्या सामानाची ऑनलाइन खरेदी केली. या गाडीला टोयोटाचे व्ही ८ इंजिन असून या गाडीचा सर्वाधिक वेग ३०८ किमी प्रतितास इतका भन्नाट आहे.

जियांगनन टीटी (मारुती ८००)

केवळ महागडय़ा गाडय़ांचीच नक्कलकार होते असा तुमचा समज असेल तर ही गाडी पाहून नक्कीच तुमचे मत बदलेल. भारताच्या लाडक्या मारुती ८०० ची चीनमध्ये नक्कल करून तिचे ‘जियांगनन टीटी’ असे नामकरण केले आहे. गाडीत ०.८ लिटरचे ३ सिलिंडर इंजिन असून यातून ३६ हॉर्सपावरची ऊर्जा निर्माण केली जाते. या गाडीचा सर्वाधिक वेग १२० किमी एवढा आहे. चीनमधील ग्रामीण भागांत आणि छोटय़ा शहरांमध्ये ही गाडी सर्वाधिक आढळून येते.

लॅन्ड विंड एक्स – ७ ( रेंज रोव्हर इवोक )

मूळ गाडीसाठी कोणताही मुलाहिजा न ठेवता ही गाडी तयार करण्यात आली आहे. ही चिनी कंपनी नक्कल करण्यात इतकी तरबेज आहे, की खरंच ही रेंज रोव्हर आहे की काय अशी शंका पाहणाऱ्यांच्या मनात निर्माण व्हावी. रेंज रोव्हरची हुबेहूब नक्कल असणारी ही गाडी केवळ रंगांच्या बाबतीत वेगळी आहे.

झोतये टी ७०० (पोर्श मॅकन)

पोर्शच्या मॅकनची नक्कल करून झोतये टी ७०० तयार करण्यात आली आहे. गाडीच्या फंट्र ग्रिलवर लावलेला लोगो सोडल्यास दोन्ही गाडय़ा अगदी एकसारख्या आहेत. पण या गाडीने पोर्शच्या एक नव्हे तर दोन गाडय़ांना आपले लक्ष्य केले आहे. गाडीची बाह्य़रचना मॅकनची असून अंतर्गत रचना किंवा इंटिरियर पोर्शच्या कायेनचे आहे. महागडी पोर्श मॅकन ज्यांना न परवडणारी आहे, त्यांच्यासाठी चीनने ही स्वस्त सवारी निर्माण केली आहे.

vaibhavbhakare1689@gmail.com

First Published on September 7, 2019 3:26 am

Web Title: replication car akp 94
Next Stories
1 डोंगरमाथ्यावरची पर्वणी
2 गणेशदर्शन
3 वाफ्यातील कंदपिके
Just Now!
X