News Flash

सेल्फीस कारण की..

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तितकेच दृढ नाते आपले ‘सेल्फी’शी जुळले आहे. प्रसंग कोणताही असो, ठिकाण कुठलेही असो आपल्या मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्याची ‘लेन्स’ तो क्षण/ठिकाण आपल्यासकट ‘कॅप्चर’ करण्यासाठी सदैव तत्पर असते. तरुणवर्गात तर विनाकारण ‘सेल्फी’ काढण्याची हौस दिसून येते. मात्र, आता तुमच्या ‘सेल्फी’ काढण्याला आम्ही एक कारण देत आहोत. सत्कारण. रोजच्या दिनक्रमादरम्यान कोणतेही चांगले काम करताना तुमचा ‘सेल्फी’ काढा आणि selfie.loksatta@gmail.com या इमेल आयडीवर आम्हाला पाठवा. तुम्ही करत असलेले काम थोरच असावे, असे काही नाही. पण त्यातून तुमची सामाजिक बांधिलकी नक्कीच दिसावी. ‘सेल्फी’ पाठवताना त्याबाबत १०० शब्दांत माहितीही पाठवा. कदाचित तुमच्या सेल्फीचे हे ‘कारण’ उद्या आणखी काहींसाठी प्रेरणा ठरेल.

‘अक्षरभारती पुणे’ या संस्थेच्या वतीने नगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागातील घाटघर, उडदावणे पांजरे या गावातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना पावसाळी कपडय़ांचे वितरण करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 12:30 am

Web Title: selfie with smartphones
Next Stories
1 मस्त मॉकटेल : मोकाचीनो
2 हसत खेळत कसरत : स्नायुंच्या बळकटीसाठी..
3 जीप..  कालची आजची..
Just Now!
X