|| डॉ. अभिजीत जोशी

हाताच्या बाहूच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूंच्या (ट्रायसेप्स मसल) बळकटीसाठी हा व्यायाम करणे आवश्यक आहे. हा व्यायाम करताना ‘थेराबॅण्ड’चा वापर करण्यात येतो.

कसे कराल?

बंद दरवाजासमारे उभे राहा. दरवाजाच्या हॅण्डलला थेराबॅण्ड अडकवून त्याची दोन्ही टोके हातात धरा. (छायाचित्र क्र. १) त्यानंतर हात कंबरेपर्यंत खाली घ्यावे. खांदे सरळ ठेवून हात जर वर उचला. (छायाचित्र २, ३) हे करताना खांदे हलू देऊ नका. हात वर घेऊन पुन्हा खाली पूर्वीच्या स्थितीत घ्या. ही कृती करताना हाताचा बाहू आणि ट्रायसेप्स मसल यांना बळकटी मिळते.