राजेंद्र श्रीकृष्ण भट

लेटय़ुसचे प्रकार

लेटय़ुसचे विविध प्रकार कुंडीत लावता येतात. यात आइसबर्ग, लाल लेटय़ुस, पार्सली इत्यादी प्रकार आहेत. मध्यम कालावधीच्या (६० ते ९० दिवस) अनेक भाज्यांची लागवड करता येते. यात चायनीज कॅबेज, पॉकचाय, रेड कॅबेज, ब्रोकोली, पर्पल फ्लॉवर, झुकिनी (पिवळी, हिरवी), स्व्ॉश (तांबडय़ा भोपळ्याचा प्रकार), सेलरी अशा अनेक भाज्या आहेत. लाल, पिवळ्या, पोपटी रंगाची ढोबळी मिरची सॅलडसाठी वापरतात. बेबीकॉर्न, ब्रुसेल्सचीही लागवड केली जाते.

कोबी, ब्रोकोलीचे गड्डे एकदम काढावे लागतात. झुकिनी, घरकीन, स्व्ॉश, रंगीत ढोबळी मिरची यांची फळे जशी तयार होतील, तशी काढता येतात. चायनीज कोबी, आइसबर्ग, पार्सलीची पाने आवश्यकतेनुसार काढता येतात. सेलरीची एक-एक काडी देठासह काढता येते.

हर्ब्स प्रकारातील वनस्पती साधारण वर्षभर टिकू शकतात. बेसिल, थाइम, मिंट, ओरिगॅनो अशा सुगंधी वनस्पतींचा यात समावेश आहे. यांची रोपे लावली जातात. यातील काही वनस्पती तुळस वर्गातील आहेत. त्यांना तीव्र सुगंध

असतो आणि विविध पदार्थात त्यांचा वापर केला जातो.