13 July 2020

News Flash

उपकरणातून जलशुद्धी

पाणी हे एक द्रव्य तसेच घन पदार्थ आहे. त्यामध्ये सेंद्रिय पदार्थ विरघळलेले असते.

|| बाजारात काय? : सुहास धुरी

जगामध्ये होणाऱ्या ८० टक्के आजारांचे कारण अशुद्ध पाणी आणि अस्वच्छता आहे.  त्यामुळे विषमज्वर (टॉयफॉईड), कॉलरा, हागवण, अतिसार, पोलिओ, कावीळ, आमांश, आतडय़ांचे आजार असे अनेक प्रकारचे आजार होतात. साधारणपणे ८-१० ग्लास पाणी दिवसभरात प्यायला हवे. परंतु ते पाणी शुद्ध असणेही जरुरीचे आहे. त्यासाठी घरगुती उपाय तर आहेतच, परंतु काही इलेक्ट्रिक उपकरणेही हे पाणी शुद्धीकरणाचे काम सहजरित्या करतात.

पाणी हे एक द्रव्य तसेच घन पदार्थ आहे. त्यामध्ये सेंद्रिय पदार्थ विरघळलेले असते. जीवाणू, विषाणू, धातू जसे शिसे, कॅडमियम, लोह, मॅग्नेशियम, आर्सेनिकचा त्यात समावेश असतो.  टीडीस (टोटल डिसॉल्व सॉलिड) ही पाण्याच्या शुद्ध-अशुद्धतेची मापन यंत्रणा आहे म्हणजेच पाण्यामधील टीडीएस म्हणजेच सेंद्रीय पदार्थ ५०० मिली/लिटर पेक्षा कमी असेल तर ते पाणी स्वच्छ असते, असा जागतिक आरोग्य संघटनेचा दावा आहे. जर पाण्यामध्ये त्यापेक्षा जास्त टीडीएस असेल तर शुद्धीकरणासाठी आरओ, यूव्ही, यूएफ, टीडीएस कॅन्ट्रोलर आदी यंत्रणा असलेले प्युरिफायर बाजारात आलेले आहेत.

आरओ (रिवर्स ओसोमोसिस) वॉटर प्युरिफायरमध्ये ०.०००१ मायक्रोनच्या छिद्रातून पाणी वेगाने प्रवाहित होते. यूव्ही (अल्ट्रा व्हायलेट) मध्ये किरणे परावर्तित केले जातात. युएफ (अल्ट्रा फिल्ट्रेशन) ज्यामध्ये विजेची आवश्यकता नाही, एनएफ (नॅनो फिल्ट्रेशन), टीडीएस कंट्रेलर आदी यंत्रणा ही पाणी शुद्धीकरणाचे काम करते.

उच्च दर्जात्मक तंत्रज्ञानासह गरम पाण्याला जलदपणे गुणवत्तेत बदलण्याची क्षमता या वॉटर प्युरिफायरमध्ये आहे. २० मिनिटांपर्यंत उकळवण्यात आलेल्या पाण्याप्रमाणे पाण्याचा प्रत्येक थेंब शुद्ध व सुरक्षित असेल याची खात्री हे उपकरण देते.    पाण्यामध्ये कॉपरची भर करण्यासोबत कॅल्शियम, मॅग्नेशियम व झिंकच्या योग्य प्रमाणाचीदेखील भर करते.

या उपकरणामध्ये हॉट, अ‍ॅम्बिएण्ट व वॉर्म असे तीन वितरण मोड देण्यात आले आहेत.  यातील इंटेलिजण्ट प्युरिटी सेन्सर सिस्टम ही यंत्रणा सतत पाण्याचे परीक्षण करत पाणी १०० टक्के आरोग्यदायी असल्याची खात्री देते. प्युरिफायर १० मिनिटांपर्यंत वापरात नसेल तर आपोआप त्याचा यूव्ही (अल्ट्रा व्हॉयलेट) लॅम्प बंद होतो, ज्यामुळे उपकरणाचा टिकाऊपणा वाढतो.  तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे उपकरण  दरवाजावर किंवा भिंतीवरही लावू  शकता. आता गरम पाण्यासह गरमागरम कॉफी बनवणे, लिंबू सरबत किंवा हनी ग्रीन टी बनवणे, तापमानाला अनुसरून पिण्याचे पाणी मिळवणे   इत्यादी कामे  सुलभ बनले आहे.

३०० ते ५०० च्या वर टीडीएस असेल तर त्यासाठी आरो, यूव्ही, यूएफ, टीडीएस कंट्रोलर ही सगळी यंत्रणा ज्यामध्ये असेल ते वॉटर फिल्टर योग्य आहे. यामुळे पाणी अ‍ॅसिडिक होत नाही, असा कंपन्यांचा दावा आहे. केन्ट, युरेका, एलजी, फेबर आदी अनेक कंपन्यांचे वॉटर प्युरिफायर बाजारात आहेत, ज्यांच्या किमती पाच हजारापासून सुरू होतात.

वैशिष्टय़े

  •  पाण्यातील २५०० पीपीएम (पार्ट पर मिलियन) च्या वर टीडीएस तपासणे शक्य
  •  विजेचा कमी वापर काहींमध्ये त्याची आवश्यकता नाही
  •  भिंतीवर व दरवाजावर सहज बसविता येते
  •  ५ ते २० लिटर पाणी साठवण क्षमता
  •  पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी इंडिकेटर
  •  पाण्याचे गुणवत्तेचे मूल्यांकन प्रति सेकंद पाच हजार वेळा

suhas.dhuri@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2020 12:05 am

Web Title: water purification from equipment akp 94
Next Stories
1 भारंगची भाजी
2 ऑफ द फिल्ड : देवाचा धावा
3 देख भाई फेक
Just Now!
X