साहित्य:

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ कप गार दूध, पाव कप चॉकलेट सिरपस, १ मोठा चमचा साखरेचा पाक, बर्फ, चॉकलेट शेव्हिंग्ज (चॉकलेटचा चुरा.)

कृती :

दूध, चॉकलेट सिरप, साखरेचा पाक आणि बर्फ ब्लेंडरमध्ये घालून फिरवून घ्या. त्याचे छान गुळगुळीत मिश्रण तयार करा. आता ज्या ग्लासामध्ये तुम्ही हे देणार आहात त्या ग्लासाच्या तोंडाच्या आकाराला साजेशा दोन ताटल्या घ्या. एकीत साखरेचा पाक घाला. दुसरीत चॉकलेट चुरा घाला. आता ग्लासाच्या वरच्या कडा आधी साखरेच्या पाकात बुडवा मग चॉकलेट चुऱ्यावर बुडवा. या ग्लासच्या वरच्या कडा छान सजल्या. आता या ग्लासात ब्लेंडरमधील मिश्रण ओता. चॉकोटिनी तयार झाले.

Web Title: Chocotini recipe for loksatta readers
First published on: 11-04-2018 at 04:52 IST