साहित्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इडलीचे पीठ, खोल थाळी (ढोकळापात्रात असतात, त्याप्रमाणे), बटर, चटणी, बटाटा, काकडी, बिट, चाट मसाला.

कृती :

आपण इडलीपात्रात इडल्या करतो, त्याऐवजी ढोकळेपात्रातील थाळीत ही मोठी इडली करून घ्यायची, परंतु ती फार जाड असू नये. इडली करण्याआधी थाळीला छान तूप लावून घ्यावे. इडली वाफवून झाल्यानंतर या इडलीचे आपल्याला आवडतील त्याप्रमाणे, त्या आकारातील तुकडे करावेत. मग नेहमीच्या सँडविचप्रमाणेच एका बाजूवर चटणी एका बाजूवर बटर लावावे. मध्ये आपल्याला आवडीच्या भाज्या लावाव्या. चाट मसाला भुरभुरून दोन्ही बाजू एकमेकांवर चिकटवून घ्याव्यात. आता ते पॅनवर हलकेच शेकून घ्यावेत. गरमागरम इडली सँडविच तय्यार!

Web Title: Idli sandwich breakfast
First published on: 01-02-2018 at 00:30 IST