नोकरीसाठी अर्ज केलेल्या कंपनीतून अथवा कार्यालयातून मुलाखतीसाठी बोलावणे आल्यास आपण पाठवलेला रेझ्युमे कंपनीच्या पसंतीला उतरला आहे, असे मानायला हरकत नाही. प्रत्यक्ष नेमणूक होण्यासाठी मात्र मुलाखतीचा टप्पा यशस्वीपणे पार करणे आवश्यक असते. मुलाखतीच्या वेळेस जे मूलभूत प्रश्न विचारले जातात, त्याविषयी जाणून घेऊ या..

अननुभवी (फ्रेशर्स) उमेदवारांना विचारले जाणारे प्रश्न..
* कौटुंबिक पाश्र्वभूमी :
आई-वडील, भावंडे, घरातील इतर सदस्य यासंबंधीच्या माहितीवरून उमेदवार कोणत्या वातावरणात वाढला आहे, त्याला/तिला नोकरीची किती गरज आहे, याचा अंदाज घेतला जातो.
* शैक्षणिक पाश्र्वभूमी : शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कुठे झाले, यासंबंधी विचारणा होऊ शकते. विद्याशाखा अथवा स्पेशलायझेशनचा विषय निवडण्यामागचे कारण विचारले जाऊ शकते. शिक्षणात खंड पडला असेल तर त्यामागचे कारण कोणते, हेही ते जाणून घेतात. शिक्षण पूर्ण केल्याचा कालावधी आणि नोकरीसाठी केलेल्या अर्जात अधिक अंतर असेल तर या मधल्या कालखंडाचा उपयोग तुम्ही कसा केला याची माहिती
विचारली जाऊ शकते.
* स्वत:बद्दल सांगा : या प्रश्नाचे उत्तर देताना अनेकदा फ्रेशर उमेदवार गोंधळतात. नोकरीचा पूर्वानुभव नसल्याने काय सांगायचे असे त्यांना वाटत असते. अशा वेळेस त्यांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातील बलस्थाने, स्वत:ची महत्त्वाकांक्षा सांगून आपण या कंपनीसाठी कसे उपयुक्त ठरू शकतो हे कथन करणे अपेक्षित आहे.
* संगणकीय ज्ञान : संगणकाचा सफाईदार वापर करता येणे हे आजच्या घडीला उमेदवाराचे अत्यावश्यक कौशल्य मानले जाते. काही विशिष्ट प्रकारच्या पदांसाठी अर्ज केला असेल तर संगणकावर त्यासंबंधात प्रत्यक्ष कामही करून दाखवावे लागते. संगणक, िपट्ररच्या कार्यपद्धतीची जुजबी ओळख असावी लागते.
* संवाद कौशल्य : उमेदवाराची भाषा, संवाद कौशल्य तपासले जाते.
* लेखन कौशल्य : लेटर
ड्राफ्टिंग, कार्यालयीन पत्रव्यवहार व्यवस्थित हाताळता येईल का, याचा अंदाज घेतला जातो.
* संदर्भ : उमेदवाराची वर्तणूक, त्याचा स्वभाव, कार्यपद्धती, विश्वासार्हता जाणून घेण्यासाठी संदर्भ (रेफरन्सेस) तसेच काही संपर्क क्रमांक उमेदवाराकडे मागितले जाऊ शकतात.
* संबंधित क्षेत्रातील सद्य घडामोडी : त्या कंपनीत अथवा संबंधित उद्योगक्षेत्रात घडलेल्या काही ठळक चालू घडामोडी, तत्संबंधी सरकारी नियम, कायदे याबद्दल विचारून उमेदवाराचे सामान्य ज्ञान तपासले जाते.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते

अनुभवी उमेदवारांना विचारले जाणारे प्रश्न..
अनुभवी उमेदवारांच्या बाबतीत काही गोष्टी गृहीत धरल्या जातात, उदा. संगणक ज्ञान, संवाद कौशल्य, लेखन कौशल्य, कार्यक्षेत्राचे मूलभूत ज्ञान (संबंधित सरकारी कायदे, नियम, कागदोपत्री व्यवहार.) इत्यादी. अनुभवी उमेदवारांना त्यांची शैक्षणिक अर्हता, कौटुंबिक पाश्र्वभूमी, आवडीनिवडी यासंबंधीचेही प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर आणखीही काही गोष्टींची पडताळणी केली जाते-
* रेझ्युमेत नमूद केल्यानुसार आधीच्या नोकरीतील अथवा नोकऱ्यांमधील त्यांच्या कामाचे स्वरूप काय होते, तसेच ग्राहक कंपन्या, पुरवठादार कंपन्या आणि सहकाऱ्यांविषयी विचारले जाते.
* नवीन नोकरी शोधण्याचे कारण जाणून घेतले जाते. आधीच्या नोकरीचा राजीनामा देताना किती दिवसांची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे तसेच नोकरीत केव्हा रुजू होता येईल, याची विचारणा होते.
* तुम्ही रेझ्युमेत नमूद केलेली उल्लेखनीय कामगिरी, निभावलेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांबद्दल सविस्तर माहिती विचारली जाते. यावरून या कामात तुमची भूमिका आणि योगदान नेमके कोणते आणि किती होते हे अजमावले जाते.
* ‘रेझ्युमे’वर नजर फिरवल्यावर जर आधीच्या नोकऱ्यांचा कालावधी खूपच कमी आहे असे दिसून आले तर उमेदवार धरसोडवृत्तीचा व निवडीसाठी अयोग्य
मानला जातो.
* मुलाखत घेणारी कंपनी किंवा उद्योग हा तुमच्या सध्याच्या कंपनीचा स्पर्धक असेल तर कामकाजातील काही गुप्त ध्येयधोरणांबद्दल (पॉलिसी सिक्रेट्स) विचारणा होऊ शकते. यावर उमेदवाराचे उत्तर- ‘ नेमणुकीनंतर या गोष्टी मी नक्कीच बोलू शकेन’ असे असायला हवे. कदाचित असे प्रश्न विचारून उमेदवाराची निष्ठा जोखण्याचा हेतू असू शकतो.
* सध्याच्या नोकरीत पार पाडत असलेल्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त नवीन कोणती आव्हाने स्वीकारायला आवडतील, असेही विचारले जाते.

आणखी काही महत्त्वाचे प्रश्न

*‘रेझ्युमे’त नमूद केलेल्या विशेष छंदांबद्दल अथवा आवडीबद्दल जुजबी प्रश्न विचारले जाऊ शकतात..
* उमेदवार केव्हापासून नोकरीत रुजू होऊ शकतो, याची विचारणा होते.
* नजीकच्या भविष्यात उमेदवाराचे काय ध्येय आहे हे जाणून घेतले जाते. यावरून तुम्ही ही नोकरी सोडण्याची सोडण्याची शक्यता आहे का, याचा अंदाज बांधला जातो.
* कामासाठी बाहेरगावी प्रवास करणे अपेक्षित असेल तर त्यासाठी उमेदवार तयार आहे का, हेही जाणून घेतात.