तुम्ही काढलेल्या नोट्स जेवढय़ा उत्तम तेवढी परीक्षेत उत्तम यश मिळण्याची हमी अधिक.  अलीकडे शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांना रेडीमेड नोट्स पुरवल्या जातात. पण खरे तर विविध पुस्तके, ग्रंथ, वर्तमानपत्रे यांतून संदर्भ शोधत स्वत: काढलेली टिपणे आपल्याला विषय समजण्यासाठी आणि अर्थातच गुण मिळवण्यासाठी उपयोगी ठरतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आणि पुढच्या भागात स्वत: टिपणं काढताना कोणती काळजी घ्यायची आणि त्याने कुठले लाभ होतात ते आपण पाहुयात.
* अभ्यासाला सुरुवात करताना अभ्यासाचा मूड लागणे महत्त्वाचे असते. प्रारंभी कुठला अभ्यास करायचा आहे, ते ठरवून मग अभ्यासाला सुरुवात करावी. एखादा धडा वाचून त्यावर आधारित कुठले प्रश्न येऊ शकतात, ते लक्षात घ्यावे. त्यानंतर या प्रश्नांची उत्तरं शोधावीत. उत्तरे लिहिताना धडय़ातील माहितीपलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा आणि त्याकरता संदर्भवाचन
उपयुक्त ठरते.
* स्वत: अभ्यासाची टिपणं काढल्याने विषयांची भीती कमी होऊन त्या विषयाचे ज्ञान वाढते आणि आपोआपच त्या विषयाचा अभ्यास करताना आत्मविश्वास येतो. ‘विषय कळत नाही,’ ही विद्यार्थ्यांची तक्रार टिपणं काढल्याने कमी व्हायला मदत होते.
* एखाद्या विषयाची टिपणं काढताना त्या विषयाच्या क्रमिक पुस्तकाचा उपयोग करावा, त्याशिवाय या विषयावर इतर संदर्भ पुस्तके आहेत का याचा शोध घ्यावा. यासाठी वाचनालयाची, इंटरनेटची मदत घेता येईल. असे केल्याने विषयाचा

आवाका लक्षात येतो. टिपणं, प्रश्नोत्तरे अधिक तपशीलवार काढता येतात. तक्ते, आलेख, चित्रे, छायाचित्रे यांचा वापर नेमका कुठे, कसा करायचा हे कळते.
* टिपणं काढताना सर्वप्रथम तुम्ही साऱ्या गोष्टी लिहून काढा. त्यानंतर टिपणांचा विस्तार कमी करण्यासाठी  त्रोटक नोट्स लिहिलेली करड बनवणे, व्हॉइस रेकॉर्डिगचा वापर करणे, प्रश्न काढणे, नियमित स्वरूपात माहिती अपडेट करण्यासाठी संगणकाचा वापर करणे अशा गोष्टी करता येतील.
* टिपणं काढताना शब्दकोश तसेच ग्रामर-चेक हाताशी ठेवा म्हणजे व्याकरणाच्या चुका टाळता येतील.
* टिपणं काढण्यासाठी समविचारी मित्रांचा गट बनवला तर कामं वाटून घेता येतील. एखाद्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, शंकांचे समाधान करण्यासाठी परस्परांशी  चर्चा
करता येईल.
* एखाद्या विषयावरची टिपणं काढायला आवडीच्या सोप्या वाटणाऱ्या धडय़ापासून सुरुवात करायची की कठीण विषयांना हात घालायचा ते तुम्ही ठरवा.
* टिपणं काढताना हाताशी सुटे कागद, पेन्सिल, कलरपेन, हायलायटनर जवळ ठेवा. टिपणं काढण्याची वेळ ठरवा. टिपणं काढण्याचं काम दुपारी अथवा रात्री केलेलं चांगलं. त्यावेळी लेखन केल्यास डोळ्यावरची झोप उडू शकेल आणि तो वेळ अभ्यासासाठी उपयोगात
आणता येईल.
* ज्या धडय़ांची टिपणं काढायची तो धडा लक्षपूर्वक वाचा आणि मग टिपणं काढायला तयार व्हा.
goreanuradha49@yahoo.in

मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make own notes for studying
First published on: 17-06-2015 at 06:10 IST