kalaनोकरी तसेच उद्योग करण्याकरता विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त करणे अत्यावश्यक असते. हे लक्षात घेत केंद्र सरकारने कौशल्यांवर आधारित काही विशिष्ट प्रशिक्षणक्रम सुरू केले आहेत. नव्याने सुरू झालेले हे अभ्यासक्रम तुमच्या शहरापासून दूर अशा शहरात उपलब्ध असले तरीही ते अल्पावधीचे असल्याने तुम्हाला काही दिवसांत पूर्ण करता येतील, या हेतूने काही नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची ओळख करून देत आहोत-

सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही संस्था सोलर फोटोव्होल्टॅक रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट या क्षेत्रातील देशामधील आघाडीची संस्था आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
सोलर फोटोव्होल्टॅक कार्यप्रणाली अंतर्गत येणाऱ्या यंत्रणेची निर्मिती करण्यासाठी या संस्थेने पुढाकार घेतला आहे तसेच या कामाकरता आवश्यक ठरणाऱ्या मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम सर्टििफकेट कोर्स इन सिस्टीम सायजिंग, इन्स्टॉलेशन, कमिशिनग अ‍ॅण्ड मेन्टनन्स ऑफ सोलर फोटोव्होल्टॅक सिस्टीम्स या नावाने ओळखला जातो. हा अभ्यासक्रम केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाद्वारे प्रायोजित करण्यात आला आहे.या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. या अभ्यासक्रमात विविध प्रकारच्या सौर संयंत्राच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे तंत्र आणि कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवले जाते. प्रशिक्षणाच्या कालावधीत तीन महिन्यांच्या प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशनच्या अंतर्गत साध्य करायच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक असणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती या अभ्यासक्रमाद्वारे होणे अपेक्षित आहे. उमेदवारांची आवश्यक अर्हता- ६० टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील पदविका किंवा पदवीधर. पदविकाधारकांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. उमेदवाराचे किमान वय २६ वष्रे असावे. अभ्यासक्रमाचे शुल्क- १५ हजार रुपये. या अभ्यासक्रमाला २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचा प्रारंभ १ जुलै २०१५ पासून होईल.
पत्ता- असिस्टंट जनरल मॅनेजर
(क्वालिटी अ‍ॅश्युरन्स कॉर्पोरेट), सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ४, इंडस्ट्रियल एरिया, शाहिदाबाद- २०१०१०. ईमेल- qac@ceisolar.com
वेबसाइट- http://www.celindia.co.in

loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?
private schools within one km of govt schools not obligated to have rte seats
वर्गभेद निर्माण करणारा शिक्षण हक्क!
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
pune , aicte, vernacular language
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?