News Flash

व्यवस्थेविरुद्धचे बंड

पदवीधर होण्याच्या आतच लवकर लग्न करून वयाच्या तेविसाव्या वर्षांपर्यंत ती तीन मुलांची आई झाली.

ही कहाणी आहे एका धाडसी स्त्रीची. कॅथरिन बोल्कोव्हॅक ही अमेरिकेतील नेब्रास्का राज्यातील माजी पोलिस अधिकारी. तिचा जन्म बोल्कोव्हॅक घराण्यातला. ती वडिलांच्या घराण्याकडून क्रोएशिअन आहे, तर तिची आई मूळची ओहायो राज्यातील रहिवासी; पण तिच्या आई-वडिलांबरोबर अनेक र्वष दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य केलेली. आई-वडील दोघांकडूनही तिला दणकट शरीरयष्टीचा वारसा लाभला. भावंडांत दुसरी असणारी कॅथरिन लहानपणापासूनच तब्येतीने एकदम धडधाकट, सशक्त होती. सहा फुटांच्या आसपास सणसणीत उंची आणि दणकट बांधा असणाऱ्या कॅथरिनला फूटबॉल, व्हॉलीबॉल असे धसमुसळे खेळ मनापासून आवडायचे. भरपूर व्यायाम करायचा आणि भरपूर आहार घ्यायचा असा तिचा लहानपणापासूनचा दिनक्रम होता.
पदवीधर होण्याच्या आतच लवकर लग्न करून वयाच्या तेविसाव्या वर्षांपर्यंत ती तीन मुलांची आई झाली. सुरुवातीची काही र्वष तिने हॉटेलमध्ये नोकरी केली. लग्नानंतर दहा वर्षांतच तिने घटस्फोट घेतला आणि ती नवऱ्यापासून विभक्त झाली. अपयशी ठरल्याच्या भावनेनं तिला घेरून टाकलं. त्याच सुमारास वर्तमानपत्रात आलेल्या िलकन पोलीस खात्याच्या एका जाहिरातीनं तिचं लक्ष वेधून घेतलं. १९८९ मध्ये तिने त्यासाठी मुलाखत दिली आणि तिची निवड झाली. कामाला सुरुवात केल्यानंतर जणू त्याच कामाकरता आपला जन्म झाला आहे, एवढी आत्मीयता तिला त्या कामाबद्दल वाटू लागली. तिच्या नीडर कार्यपद्धतीमुळे तिला ‘झेना’ (एक लढाऊ राजकन्या) असं टोपणनावही मिळालं.
पण आठ-नऊ र्वष सलग काम केल्यानंतर गुन्हेगार आणि त्यांच्या जगाशी कामामुळे येणारा सततचा संपर्क आणि त्यातील धोके यापासून तिला दूर जावंसं वाटू लागलं. आणि त्याच वेळेस तिच्या पोलीस स्टेशनात डीनकॉर्प कंपनीची ‘युनो’च्या ‘इंटरनॅशनल पोलीस टास्क फोर्स बोस्निया’मध्ये एक वर्षांकरिता निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या भरतीविषयीची जाहिरात झळकली. तिने लगेच ती संधी साधून अर्ज भरला आणि अर्थातच प्रशिक्षणाकरिता तिची निवड झाली. इतकंच नव्हे तर त्यातूनही ठणठणीत तब्येत आणि खणखणीत मन यांच्या जोरावर ‘आयपीटीएफ’मध्ये ती दाखलही झाली.
वयाच्या अडतिसाव्या वर्षी एका वर्षांकरिता मुलांपासून दूर ५००० मलांवर असलेल्या ठिकाणी जाण्याचा तिचा निर्णय सोपा नक्कीच नव्हता. परंतु मुलांनीच तिला मनापासून धीर आणि पािठबा दिला आणि जून १९९९ मध्ये ती तिच्या पथकाबरोबर बोस्नियातील सारायेव्हो शहरात ‘यूनो’च्या कार्यालयात दाखल झाली. इथे ‘आयपीटीएफ’तर्फे निवडले गेलेले आणि ‘यूनो’च्या ४५ सभासद देशांमधून आलेले जवळजवळ २००० पोलीस अधिकारी एकत्र आले. त्या सर्वाकडे जी कामगिरी सोपवण्यात आलेली होती, त्याला त्या भूप्रदेशातील अनेक र्वष चाललेल्या युद्धाची पाश्र्वभूमी होती.
१९९२ च्या सुरुवातीला युगोस्लाव्हिया या देशातील साम्यवादाचं, कम्युनिस्ट सत्तेचं उच्चाटन झालं. परंतु त्याचवेळी सर्बयिा प्रांताच्या अध्यक्षाची सत्ता प्रबळ होत होती. या दोन गोष्टींमुळे बोस्निया आणि हरझेगोव्हिया या दोन प्रांतांनी युगोस्लाव्हियापासून स्वतंत्र व्हायचं ठरवलं. त्या दोन प्रांतांत पूर्वीपासूनच कॅथलिक पंथाचे क्रोएट्स, सनातनी वृत्तीचे सर्ब आणि मुस्लीम असे भिन्नधर्मीय लोक एकत्र नांदत होते. पण एप्रिल १९९२ नंतर हे सर्व चित्र बदलत गेलं. सर्बयिन लोकांनी सारायेव्हो शहरातील मुस्लीम आणि क्रोएट्स समुदायांवर हल्ले करायला सुरुवात केली. जिथे जिथे बोस्नियन नागरिक राहत होते तिथे तिथे हे हल्ले चालू होते. शेवटी तर सर्बयिन हुकूमशहाने सारायेव्हो शहराची नाकेबंदी करून शहराला सनिकांचा वेढा घातला. आजवर जगभरात झालेल्या अनेक युद्धांच्या इतिहासात एखाद्या राजधानीच्या शहराची सर्वात जास्त काळ केलेली ही नाकेबंदी ठरली. शेवटी डिसेंबर १९९५ मध्ये ‘डेटन शांती करारा’ने साडेतीन र्वष चाललेल्या या एकतर्फी युद्धाचा शेवट झाला आणि बोस्निया आणि हरझेगोव्हिया असे दोन नवे देश अस्तित्वात आले.
‘डेटन शांती करारा’प्रमाणे ‘यूनो’च्या सुरक्षा समितीने बोस्निया आणि हरझेगोव्हिया या देशांत मनुष्यहिताची कामं करणं अपेक्षित होतं. त्यात युद्धात निर्वासित झालेल्या लोकांची सोय बघणं, जमिनीत पेरलेले सुरुंग नष्ट करणं, मानवी हक्कांची जपणूक करणं, निवडणूक घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं, आíथक व्यवस्थेची पुनर्रचना करणं, रस्ते, नागरी आणि पायाभूत सुविधा यांची पुनर्बाधणी करणं, पोलीस यंत्रणा नव्याने उभारणं, त्याकरिता पोलीस भरती करणं आणि त्या निवडलेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण करणं, अशी ही अनेक कामांची यादी होती.
त्याकरिता बोस्नियात ‘इंटरनॅशनल पोलीस टास्क फोर्स’ (आयटीपीएफ) आणि नागरी कामांकरिता कार्यालय स्थापन करण्यात आलं. ‘आयटीपीएफ’ तयार करण्याकरिता ‘यूनो’ला सभासद देशांच्या अंतर्गत पोलीस यंत्रणेतून माणसं पुरवण्यात आली. अपवाद होता तो अमेरिकेचा. कारण त्या देशात पोलीस व्यवस्था ही त्या- त्या शहराची आणि राज्याची जबाबदारी असते. म्हणून तिथे अशी भरती करण्याकरता ‘डीन कॉर्प’ या खाजगी संस्थेला कंत्राट देण्यात आलं
‘डीन कॉर्प’तर्फे कॅथरिन सारायेव्होत दाखल झाली, पण तिला फक्त कार्यालयीन कामात रस नव्हता. म्हणून तिने मानवी हक्क जपणुकीसंबंधीचं कामाचं क्षेत्र निवडलं. त्याकरिता इलिझा गावात तिची नेमणूक करण्यात आली. तिथे तिच्याबरोबर व्हेनेटा नावाची एक अमेरिकन सहकारीही होती. तिच्यावर आता युद्ध-काळात घर सोडून पळून गेलेल्या लोकांचं पुनर्वसन करण्याची किचकट जबाबदारी होती. कारण युद्धापूर्वी युगोस्लाव्हियातील बोस्नियात सर्ब लोक, क्रोएट्स आणि मुस्लीम लोक वेगवेगळ्या भागांत वस्त्या करून राहत होते. परंतु युद्धानंतर सर्वत्र अंदाधुंदी माजली होती. निर्वासितांच्या छावणीत जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा होता. त्यांची सोय लावण्याचं काम कॅथरिनला दिवसभर पुरून उरायचं. याशिवाय बोस्नियातील पोलीस खात्याची नव्याने उभारणी करण्याचं कामही तिच्याच विभागाकडे सोपवण्यात आलेलं होतं. मुळातच अतिशय कमी वेतनावर काम करणाऱ्या तिथल्या पोलीस खात्यात लाचखाऊपणा आणि भ्रष्टाचाराला ऊत आला होता. पोलिसांची नागरिकांशी वर्तणूक मग्रुरीची आणि उर्मट होती. याला वळण लावण्याच्या अतिशय अवघड कामात कॅथरिन तिच्या सहकाऱ्यांसमवेत गुंतली.
त्यानंतर काही काळातच तिच्यातील गुणवत्ता हेरून तिच्यावर स्त्रियांवरील हिंसाचाराची परिणामकारक उकल करणं- अशा स्वरूपाची जबाबदारी सोपवण्यात आली. आणि ऑक्टोबर १९९९ ते डिसेंबर १९९९ या कालावधीत झेनिया या सारायेव्होच्या उत्तरेला असलेल्या गावात तिने आपल्या कामाची सूत्र हाती घेतली. या ठिकाणी प्रसंगी जीव धोक्यात घालून कॅथरिनने अत्यंत घृणास्पद गोष्टींचा शोध लावला. ‘डीन कॉर्प’सारख्या खाजगी भाडोत्री सनिकांच्या कंत्राटदाराबरोबर, ‘यूनो’ आणि अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याबरोबर साटंलोटं असणाऱ्या अधिकाऱ्यांची मानवी व्यापारात अडकलेल्या स्त्रियांना जबरदस्तीने वेश्या-व्यवसाय करायला भाग पाडण्याची बिगं तिने उघडकीला आणली.
ही गोष्ट ‘डीन कॉर्प’लाच काय, पण अमेरिकन परराष्ट्र खात्यालाही परवडण्याजोगी नव्हती. परिणामी लवकरच तिची पदावनती करून तिला कामावरून काढून टाकलं गेलं. पुढे जिवाला धोका उत्पन्न झाल्यामुळे कॅथरिनने बोस्निया सोडलं आणि ती मायदेशी- अमेरिकेला परतली. पण मुळात एक धडाडीची पोलीस अधिकारी असलेल्या कॅथरिनने आपल्या शोधाचे सर्व पुरावे जपून ठेवले होते. त्यांच्या भक्कम आधारावर तिने ‘डीन कॉर्प’ कंपनीविरुद्ध खटला दाखल केला आणि तो जिंकला. ‘डीन कॉर्प’ कंपनीची काळी कृत्यं उजेडात आणण्यात ती यशस्वी झाली .
‘द व्हिसलब्लोअर’ या मूळ इंग्रजी कादंबरीचा हा मराठी अनुवाद आहे. मुळात या पुस्तकाच्या कथनाचा आवाका मोठा आहे. त्याला वस्तुस्थितीतील राजकीय संदर्भ आहेत. त्यामुळे अनुवादाचं काम कौशल्याचं होतं. ते ठीक झालं आहे. परंतु काही वेळा शैली बोजड वाटते. ती अधिक सहज असायला हवी होती असं जाणवतं. एरवी बातम्या ऐकताना ज्यांची नावं आपल्या कानावर पडली तरी आपण ज्यांची फारशी दखल घेत नाही, अशा देशांपकी एका देशातील घडामोडी मराठी वाचकांपर्यंत आवर्जून पोहोचवण्याचं श्रेय या पुस्तकाला द्यावंच लागेल. ल्ल

‘एकाकी बंड ’- मूळ लेखक : कॅथरिन बोल्कोव्हॅक आणि कॅरी लीन, अनुवाद: सिंधू जोशी,
मेहता पब्लििशग हाऊस.
पृष्ठे- २२०, किंमत- २५० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 2:24 am

Web Title: book ekaki band by kathryn bolkovac
Next Stories
1 रोहित वेमुला हवा की नको?
2 संघर्षांला संवादाची जोड हवी..
3 महासागरावरची शिष्टाई!
Just Now!
X