गायत्री हसबनीस

दरवर्षीप्रमाणे यंदाही रायपूर, बिहार, कानपूर, जयपूर, मुंबई, हिमाचल प्रदेश इथे ‘युवा महोत्सव’ साजरा करण्यात आला. येथील महाविद्यालयात विविध तरुण आणि तरुणी गावागावातून शिकण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ‘युवा महोत्सवा’चा भाग होणं ही खूप महत्वाची बाब आहे. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग, शिक्षकांकडून मदत आणि कसे व कोणते उपक्रम राबवले जातात हे जाणून घेण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. भारतभर हा महोत्सव  शैक्षणिक वर्षांतला एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना यात मोठय़ा प्रमाणात सहभागी करून घेण्यास आग्रही असतात. भारतात काही निवडक महाविद्यालयातून ‘युवा महोत्सव’ साजरा केला जातो.

Vasundhara Day, Yavatmal,
‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड
mahavir jayanti celebration marathi news
सांगली: भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
Meteorological department predicted heat wave in Raigad Thane Palghar along with Mumbai Pune
मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उकाडा वाढणार; यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात तीन दिवस उष्णतेची लाट

तरुण उद्योगपती, खेळाडू, अभिनेते, शास्त्रज्ञ यांच्या विचारांचा प्रभाव अनेक तरुणांवर आहे आणि त्यांच्या प्रभावी विचारांचा वारसा पुढे चालवत राहण्यासाठी समाजात अनेक उत्तमोत्तम उपक्रम राबवले जातात. तेव्हा प्रत्येक तरुणाने या प्रयत्नांची जाण ठेवत स्वत: पुढे येऊन आत्मविकासाबरोबर समाजहितही साधले पाहिजे. वास्तविक युवा पिढी ही सक्षम, कार्यक्षम आहे, यात काही शंका नाही परंतू त्यांना आणखी मजबूत करण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव देत नवे काही घडवून आणण्याची प्रेरणा त्यांना मिळावी यासाठी देशभरात युवा महोत्सवाचे (युथ फेस्टिव्हल)आयोजन केले जाते. तरूणांनी वैयक्तिक पातळीवर काही करण्यापेक्षा समूहाने एकत्र येऊन काहीतरी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी दरवर्षी ‘युवा महोत्सव’ ही संकल्पना राबवली जाते. महाविद्यालयीन पातळीवर युवा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला होता. इंजिनीअरिंग, कला, मेडिकल, साहित्य, क्रीडा, संगीत, नृत्य या सर्व प्रकारच्या महाविद्यालयातून संपूर्ण भारतात दर वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात ‘युवा महोत्सव’ साजरा होतो. यंदाही देशभरातील विविध महाविद्यालयातून पार पडलेल्या युवा महोत्सवाला मोठय़ा प्रमाणावर तरूणाईचा प्रतिसाद मिळाला.

भारत हा तरुणांचा देश आहे. त्यामुळे प्रत्येक पिढीने आपल्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध मंचावरून स्वत:ला सिद्ध करणं गरजेचं आहे. युवा महोत्सवातून त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळते. देशातील घडामोडी विकासाच्या दृष्टीने पुढे जात असताना या विकासाचा एक भाग म्हणून तरुणाईला युवा महोत्सवातून मोठय़ा प्रमाणावर आतंरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पोहचण्याची संधी मिळते. या महोत्सवाचा उद्देश हा फक्त महाविद्यालयीन फेस्टिवल इतका मर्यादित नसून त्यांना विविध क्षेत्रातील करिअरसाठी प्रोत्साहित करणे हाही आहे. पारंपरिक नृत्य, संगीत, गायन, वादन, अभिनय, कला, भाषण, संभाषण या कौशल्यातून त्यांनी आत्मविश्वासाने सर्वासमोर यावे यासाठी या महोत्सवांतर्गत देशभरातील तरूणाई विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांतून एकत्र येते. आणि त्यातून भारतीय संस्कृतीची देशांतर्गत देवाणघेवाण होते. यातून एकजूट निर्माण होते. राज्याराज्यांतील तरूणांमध्ये विचारांची, संधींची देवाणघेवाण होते. युवा महोत्सवाचे स्वरूप फक्त सांस्कृतिक देवाणघेवाण एवढेच नसून तरूण उद्योजक, खेळाडू, शास्त्रज्ञ, लेखक, रंगकर्मी घडवणे असे आहे. तरूणांकडे कित्येक गोष्टींचा अभाव असतो त्यातून त्यांची प्रगती होत नाही. तरूणांना संधी प्राप्त होईल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे परंतु प्रथम त्यांना मार्गदर्शन करुन प्रत्यक्ष उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक ठरते आणि हा प्रयत्न महाविद्यालयातून, शिक्षकांकडून होतो आहे. भारतात तरूण पिढीच्या मनात बेरोजगारीची भीती आहे, न्यूनगंड आहे. युवा महोत्सवातून सहभागी झाल्याने हा न्यूनगंड कमी होण्यास नक्कीच मदत होते. देशभरात आपल्याला काही संधी उपलब्ध आहेत का याची चाचपणीही त्यांना करता येते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रायपूर, बिहार, कानपूर, जयपूर, मुंबई, हिमाचल प्रदेश इथे ‘युवा महोत्सव’ साजरा करण्यात आला. येथील महाविद्यालयात विविध तरूण आणि तरूणी गावागावातून शिकण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ‘युवा महोत्सवा’चा भाग होणं ही खूप महत्वाची बाब आहे. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग, शिक्षकांकडून मदत आणि कसे व कोणते उपक्रम राबवले जातात हे जाणून घेण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. भारतभर हा महोत्सव  शैक्षणिक वर्षांतला एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना यात मोठय़ा प्रमाणात सहभागी करून घेण्यास आग्रही असतात. भारतात काही निवडक महाविद्यलयातून ‘युवा महोत्सव’ साजरा केला जातो.

मुंबई

मुंबई विद्यापीठ आणि एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा महोत्सव’ साजरा केला जातो. विविध सांस्कृतिक, बौद्धिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्राथमिक फेरीतून निवडण्यात येते. यातून वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, एकांकिका स्पर्धा मोठय़ा प्रमाणात आयोजित केल्या जातात. तसेच संगीत, गायन, नृत्य यांचीही स्पर्धा रंगते आणि त्यातून अंतिम फेरीतील सादरीकरणातून विजेता घोषित केला जातो. तीन तपाहून जास्त काळ हा युवा महोत्सव सुरू आहे. पदवी अभ्यासक्रमाला असलेले विद्यार्थी आणि ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी यात सहभागी होऊ  शकतात. मुंबईतील विविध महाविद्यालये आणि संस्थेची अंतर्गत महाविद्यालये मिळून तब्बल २० पेक्षा जास्त महाविद्यालयांचे विद्यार्थी यात सहभागी होतात. यातून मुंबईतील कला, विज्ञान आणि तंत्रज्ञानासंबंधित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठय़ा स्तरावर म्हणजे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठावर सहभागी होण्याची संधी मिळते. तीनशेहून अधिक तरूण येथे सहभागी होतात. सप्टेंबर महिन्यात या महोत्सवाची सुरुवात आणि सांगता होते. विद्यार्थ्यांच्यापरीक्षे अगोदर युवा महोत्सव आयोजित के ला जात असल्याने विद्यार्थी आनंदाने यात सहभागी होतात.

हिमाचल प्रदेश

पीजी सेंटर – शिमला, संस्कृत कॉलेज -कटारू, आर. के. एम. वी. – शिमला, फाइन आर्ट्स कॉलेज – शिमला, भटोली कॉलेज आदी कॉलेजच्या विद्यार्थ्यांंनी यावर्षी या महोत्सवात भाग घेतला होता. सोलन, ढलियारा, कोटशेरा, ऊ ना, करसोग, हमीरपुर, जोगिंद्रनगर अशा शहरांतल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंचाही यात सहभाग होता. यात सातशेहून अधिक विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला आणि ५० पेक्षा जास्त महाविद्यालयेही महोत्सवात सहभागी झाली होती. या महोत्सवाचा उद्देश नवोदित संगीताचे सादरीकरण करणे आणि सांगितिक शैली विकसित करुन शास्त्रीय संगीताकडे तरूणांना वळवावे, असा आहे. कृषी विश्वविद्यालय, सीमा महाविद्यालय, गव्हर्मेंट कॉलेज -धरमशाला येथे आंतरमहाविद्यालयीन एकांकिका, एकपात्री प्रयोग, नाटकमाला यांनाही प्राधान्य दिले जाते.

रायपूर

रायपूरचे युवा महोत्सवाचे हे विसावे वर्ष होते. येथे हस्तकलेला जास्त प्राधान्य देण्यात येते. नृत्यात भरतनाटय़म, कुचीपुडी, ओडिशी, कत्थक, मणिपुरी तर संगीतात लोकगीत, हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत, कर्नाटकी संगीत महोत्सव हे विशेष आकर्षण असते. वादन म्हणून तबला, हार्मोनियम, गिटार, सितार, वीणा, मृदंगम, बासरी तर तात्कालिक नाटक, एकांकिका, भाषण यांचाही महोत्सवात समावेश असतो. तसेच युवा संमेलन, व्याख्यानमाला, क्रीडा, फुड फेस्टिवल, विशेष सांस्कृतिक प्रदर्शने आयोजित करण्यात येतात. दरवर्षी जानेवारीत युवा दिनाच्या निमित्ताने हा महोत्सव साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी शंभरहून जास्त विद्यार्थ्यांंशी व्हिडिओ चॅटद्वारे संपर्क साधतात. येथे युवा साहसिक महोत्सवही रंगतो ज्यात तरूण खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते.

कानपूर

कानपूर युवा महोत्सवात डीजी कॉलेज, एस.एन.सेन कॉलेज, डीएवी कॉलेज, जुहारी देवी गर्ल्स पीजी कॉलेज, महिला महाविद्यालय आदी महाविद्यालयीन विद्यर्थ्यांचा सहभाग होता. कानपुर, औरेया, देहात, उन्नाव, हरदोई, रायबरेली, चित्रकूट या शहरातील विविध महाविद्यलयातील विद्यर्थ्यांनी आपले सादरीकरण केले. संगीत, नृत्य, फॅशन शो, फेस पेंटिंग, रांगोळी, गायन, वाद्य, फोटोग्राफी, कोलाज असे वेगवेगळे कार्यक्रम इथे पार पडतात. कानपूर विद्यापीठांतर्गत युवा संमेलन राबवले जाते ज्यात पन्नापेक्षा जास्त महाविद्यालयांचा सहभाग असतो. येथे २६ विविध सांस्कृतिक उपक्रम असतात त्यामुळे तरूणांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होता येते.

जयपूर

‘नेहरू युवा केंद्रा’तर्फे विविध महाविद्यालयातील विद्यर्थ्यांनी आपले कलागुण विकसित करावेत यासाठी दरवर्षी जयपूर येथील महाविद्यालयात युवा महोत्सव साजरा केला जातो. ४ प्रकारच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात येते. त्यात नृत्य , नाटक, भरतनाटय़म, गायन, वादन यांचा समावेश असतो. गुलाबी नगर म्हणून ओळखले जाणारे हे शहर आहे. त्यामुळे त्या रंगाप्रमाणे जयपूर सुंदर रहावे म्हणून सर्वत्र पाणी, रस्त्यावरील सफाई, टॉयलेट साफ करण्याची मोहीम हाती घेतली जाते. एस. एस. जैन सुबोध महाविद्यालय या महाविद्यालयाचा सहभाग युवा महोत्सवात जास्त असतो. याच महिन्यात जयपूर युवा महोत्सवही साजरा केला जातो.

बिहार

समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, एकल लोकगीत, लोकगाथा, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय वादन (एकल), सितार, गिटार, तबला, बासरी, वीणा, मृदंगम, हार्मोनियम, व्हायोलिन, सारंगी, पखवाज वादन, ध्रुपद-धमार, सुगम संगीत, नाटक, चित्रकला, मूर्तिकला, हस्तशिल्प, छायाचित्र और वक्तृत्व स्पर्धा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा बिहार येथील युवा महोत्सवात होतात. जिल्हास्तरीय ३,००० विद्यार्थी विविध महाविद्यालयांतून सहभागी होतात. इथल्या परंपरेप्रमाणे युवा महोत्सवात पूजा आरती केली जाते. येथे भोजन महोत्सवही भरवण्यात येतो. तसेच युवा संमेलन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रदर्शनही भरवण्यात येते.

‘युवा महोत्सवा’ला दरवर्षी देशभरातून उदंड प्रतिसाद मिळतो. प्रचंड अभ्यासातून स्वत:ला बाहेर काढत थोडावेळ विविध सांस्कृतिक कार्यक्रमात रमणारी आजची पिढी राष्ट्रीय स्तरावर भरपूर संख्येने सहभागी होऊन टप्प्याटप्पाने पुढे जाते आहे. फक्त सांस्कृतिक कार्यक्रमातून वर येण्यापेक्षा सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ न या युवा महोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचते आहे. आपणही राष्ट्रीय स्तरावर एकत्र येत सांस्कृतिक, वैचारिक देवाणघेवाणीतून देशभरातील तरूणाईशी जोडले जात आणखी बळकट व्हायला हवं!

viva@expressindia.com