News Flash

कॅफे टिप्सेरिया : मिशन साफसफाई

च्छतेच्या नाऱ्याने सणांचं ग्रॅण्ड वेलकम करू या..

अॅपलचं सिरीहे तर फक्त अॅप्लिकेशन, पण टिप्सेरियातली सिरीन प्रत्यक्ष जगायला शिकवतेआता दिवाळीसाठी घर सजवायचे वेध लागले आहेत. साफसफाई हा पहिला टप्पा. पण लोक्स, जरा जपून!

हाय फ्रेण्ड्स, कैसे हो? मजा मां..? गरबा, दांडिया झालं आता सर्व आणि माझ्या आवडीचा सण फायनली जवळ आला आहे. इट्स दिवाली टाइम! ये वक्त कैसे गुजरता है नी? आय जस्ट काण्ट बिलीव गाईज की, वर्ष संपायला आलं. ते उगाचच नाही म्हणत- ये वक्त किसी के लिए नही रुकता. लेट इट बी.. मै भी किसी के लिए नही रुकती; बस ये पावरी आण्टी के कॅफे मे आनेवाली खुशबू मुझे रोक लेती है. सो माझी कॉफी आणि सुलतानी बिस्किट्स येईपर्यंत लेट्स टॉक आबाउट अवर न्यू टॉपिक. फेस्टिव्ह सीझन आहे. त्यामुळे घरात जितका आनंद आणि उत्साह असतो, तितका पसाराही असतोच. गिफ्ट्स येतात तितकाच नको तेवढा कचरा आणि अवाजवी वस्तूंचाही ढीग जमा होत असतो. त्यामुळे दिवाळीच्या आधी मग सगळ्यांच्याच मम्मा, पापा आणि घरातले मोठे लोक ‘स्वच्छ भारत’चा नारा लावत साफसफाईचा तगादा लावतात. आता तुम्हीच सांगा ना, आपल्या यंग जनरेशनचं रुटीन किती स्टफ्ड असतं, त्यात साफसफाईला वेळ काढणं म्हणजे मुहूर्त काढण्यासारखंच आहे. पण, फिकर नॉट! मी असताना घाबरायचं कारण नाही. साफसफाईच्या या कंटाळवाण्या कामाला आणखीनच मजेदार बनवू या आणि स्वच्छतेच्या नाऱ्याने सणांचं ग्रॅण्ड वेलकम करू या.. सो हिअर वी गो..

तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची आणि विशेष सूचना : फक्त स्वत:च्या रूमची जबाबदारी घ्या. (याचा अर्थ आईला मदत करू नका असा नाही, बरं का!) पण उगीच अख्खं घर आवरण्याची भीष्मप्रतिज्ञा करू नका. आपल्या रुटीनमधून वेळ काढून आपण फक्त आपली खोली चकाचक करणं जमवलं तरी खूप! अख्ख्या घराची जबाबदारी घेतलीत आणि आवरून झालं नाही तर कामापरी काम आणि वर बोलणी असा डबल धमाका! त्यापेक्षा नो युअर बाउंडरीज आणि अख्खं घर आवरणं इज नॉट अवर कप ऑफ टी, त्यासाठी ‘आई’च असावं लागतं. सो, मिशन साफसफाई मोड ऑन..

१. नो गाजावाजा : सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘मी रूम आवरणार आहे’ अशी गर्जना आधीच करू नका. घरातल्या मोठय़ांना ही गोष्ट आधीच सांगितलीत की त्यांची डेडलाइन, त्यांच्या हजार सूचना, त्यांनी ‘ऑफर’ केलेली मदत, त्यांच्या ‘वाढत्या’ अपेक्षा, आपल्या कामावरचं त्यांचं ‘सुपरव्हिजन’ आणि त्यातून आपल्याला वेळोवेळी दाखवून देण्यात येणाऱ्या चुका यांचं प्रेशरच जास्त येईल आणि मूळ काम राहील बाजूलाच! त्यापेक्षा अचानक रूम स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकी दिसली की त्यांना ‘गुणी’ मुलाने दिलेल्या ‘सरप्राइज’चा आनंदही होईल आणि आपलं कामही शांततेत, आपल्या फुरसतीत पार पडलेलं असेल.

२. टू-डू लिस्ट : आपल्या रूममध्ये नक्की किती पसारा आहे, काय काय पसारा आहे याची एकदा पाहणी करा, म्हणजे कामाचा आवाका किती आहे त्याचा अंदाज येईल. आवरायच्या गोष्टींची प्रायोरिटीनुसार टू-डू लिस्ट बनवा जी तुमची ‘चेकलिस्ट’ही असेल. त्याच लिस्टमध्ये प्रत्येक ‘टास्क’ला लागणारा अंदाजे वेळही लिहून ठेवा. त्यानुसार प्लॅन करून कामं हातावेगळी करा.

३. वर्क स्मार्ट : टेबल-टॉप, स्टोरेज-टॉप, ड्रेसिंग टेबल अशा टॉप्सवर पडलेल्या लहानसहान गोष्टी उदाहरणार्थ कानातले, घडय़ाळ, गॉगल, कंगवा, पेन, आयकार्ड, पाकीट अशा वस्तू आधी जागेवर ठेवा, थेट कपाटाला हात घालू नका. दिवाळीत कोणीही तुमचं कपाट उघडून बघणार नाही. त्यामुळे समोर ‘दिसण्यात’ येणाऱ्या गोष्टी आधी आवरून घ्या, थोडासा ‘शो बिझनेस’ होऊ  द्या.

४. डोण्ट मेस इट अप : स्वत:च्या कर्माने स्वत:ची कामं वाढवून घेऊ  नका. म्हणजे, एक पसारा आवरताना अजून पसारा घालून ठेवू नका. उदाहरणार्थ टेबलावरची पुस्तकं उचलून ठेवताना अख्खं अभ्यासाचं कपाट विस्कटल्यासारखं वाटलं किंवा बाहेरचे कपडे आत ठेवताना खण आवरायला हवाय असं लक्षात आलं म्हणून लगेच सगळं कपाट बाहेर काढून बसू नका. अशाने कामं वाढतील, पसारा वाढेल, वेळ कमी पडेल आणि ते सगळं आवरायचा कंटाळाही येईल.

५. खळ्ळ खटय़ाक नको : आरसे, खिडक्या वगैरे पुसायला गेलात तर जरा धीरे से! काचा फुटल्या तर त्यासारखं दुसरं ‘महत्पाप’ नसेल. (हा आईचा ‘खास’ शब्द!) करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं होऊ  देऊ  नका. कौतुक तर खूप दूरची गोष्ट, ओरडा मात्र ‘जी भर के’ मिळेल. काचा पुसताना कितीही ‘जिद्दी’ डाग असले तरी शक्तीचे प्रयोग नकोत. काचा हलक्या हाताने, स्वच्छ कपडय़ाने पुसा. डाग गेले नाहीत तर दोनदा-तीनदा पुसा, पण उगीच जोर लावून तोडफोड करू नका. अगदीच नाही तर ‘दाग अच्छे हैं’ म्हणून डाग तसेच राहू द्या पण ‘मम्मीजी की डाँट’ नको.

६. कीप इट सिंपल : भिंती पुसणं, छत पुसणं, फॅन स्वच्छ करणं, पडदे बदलणं अशी ‘मोठ्ठी’ कामं एकटे हातात घेऊ  नका. फोटो फ्रेम, वॉलपीस, भिंतीवरचं घडय़ाळ, फ्लॉवरपॉट अशा लहान गोष्टी बदला, स्वच्छ करा. याने रूमचा ‘लुक’ रिफ्रेश होईल आणि मुख्य म्हणजे हे कमी कष्टात आणि कमी वेळात होईल. मोठे बदल करून रूमचं ‘परिवर्तन’ वगैरे करायला जाऊ  नका. त्यापेक्षा कीप इट सिंपल अ‍ॅण्ड स्वीट!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 4:51 am

Web Title: cleaning mission
Next Stories
1 हटके होम डेकॉर
2 दिवाळी स्ट्रीट शॉपिंग
3 वजनदार फॅशन
Just Now!
X