07 August 2020

News Flash

फॅशनदार : चाहूल नव्या फॅशन वर्षांची..

आता क पडय़ांनंतर आपण या वर्षीच्या अ‍ॅक्सेसरीज आणि ज्वेलरी ट्रेंड्सवर एक नजर टाकूयात

सायली सोमण viva@expressindia.com

डिसेंबरच्या महिन्यात जसजसे दिवस एकामागून एक पुढे सरकत जातात तशी आपली नवीन वर्षांचे स्वागत करण्याची उत्सुकता वाढतच जाते. फक्त ख्रिसमस पार्टी किंवा न्यू इअर पार्टीबद्दलची उत्सुकता नाही; तर येणाऱ्या नवीन वर्षांत आपण नवीन संकल्प, योजना जे काही ठरवले असेल ते पूर्णत्वास नेण्याची घाईही आपल्याला असते. हे नवीन संकल्प फक्त आपणच आपल्यापुरते करतो असं नाही, तर प्रत्येक क्षेत्रातील अधिकारी संस्था किंवा धोरणी व्यक्ती त्या क्षेत्राची लोकांना असलेली उपयुक्तता लक्षात घेऊन नवीन वर्षांच्या दृष्टीने काही ना काही संकल्प करतात. उदाहरणार्थ हवामान खाते येणाऱ्या वर्षांत वातावरणात काय बदल होतील याचा अभ्यास करून त्यानुसार लोकांना उपयोगी पडतील अशा योजनांचा विचार करते. एप्रिलमध्ये नवीन आर्थिक वर्ष चालू होते तर त्याअगोदरच त्याचे बजेट तयार केले जाते. तसेच प्रत्येक वर्षांच्या शुभारंभाला फॅ शन फोरकास्टर्सयेत्या वर्षांतील फॅशन ट्रेंड्सचा पूर्वअभ्यास करून ठेवतात आणि सामान्य लोकांना त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल या हेतूने त्याची माहिती सर्व ब्रँड्स, लेबल्स, डिझायनर्सपर्यंत पोहोचवतात. ही माहिती नववर्ष सुरू होण्याआधी काही महिने त्यांच्यापर्यंत पोहोचते, जेणेकरून नवीन वर्षांच्या सुरुवातीपासूनच नव्या ट्रेंड्सप्रमाणे डिझाईन केलेले कपडे, अ‍ॅक्सेसरीज मार्केटमध्ये पोहोचतात. या फोरकास्टची सर्वसाधारण कल्पना आपण मागच्या लेखात घेतली. त्यासाठी जे फॅ शन एलिमेंट्स लागतात त्याचीही माहिती घेतली. आता या लेखात आपण तयार कपडे, त्याच्याबरोबर लागण्याऱ्या अ‍ॅक्सेसरीजबद्दल जाणून घेणार आहोत.

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे वर्षांची सुरुवात हिवाळ्यात होत असल्यामुळे लेअर्ड क्लोदिंगवर जास्त भर दिला जातो. लेअर्ड क्लोदिंग म्हणजे थोडक्यात थंडीपासून वाचण्यासाठी एका विशिष्ट कपडय़ावर त्याला साजेसा दिसणारा एखादा स्वेटर किंवा जॅकेट घालणे आणि एक छानसे मफलर किंवा स्कार्फने ते अ‍ॅक्सेसराईज करणे. साठच्या दशकातील फॅशन ट्रेंड्स आपल्याला या वर्षी नव्याने बघायला मिळणार असून त्या पद्धतीचे मिडी स्कर्ट्स, हिप्पी पद्धतीचे शर्ट्स आणि पायजमा पँट्स, पुरुषांमध्ये मोठय़ा कॉलरचे शर्ट्स यांची चलती असेल. त्याचबरोबर डिझायनर फुगेरी स्लीव्हजचे गाऊन्स/ड्रेसेस आणि केप पद्धतीचे जॅकेट्स हे स्त्रियांमध्येही तितकेच लोकप्रिय होतील. याच्या जोडीला नवीन वर्ष जसजसं पुढे सरकेल तसं ऐंशीच्या दशकातील काही फॅशन ट्रेंड्सही बाजारात दिसायला लागतील. उदाहरणार्थ रुंद खांद्यांचे आणि शोल्डर पॅड असलेले ब्लेझर्स आणि फॉर्मल सूट, डेनिम आणि लेदरचे ऐंशीच्या काळात मिळायचे तसे कमी लांबीचे जॅकेट्स किंवा अ‍ॅनिमल प्रिंट असलेले कपडे आणि बूट्स. पॅचवर्क किंवा अ‍ॅप्लिक पद्धतीच्या सरफेस ऑर्नमेंटेशनमधील कपडे आणि बॅग्ज आपल्याला जास्त प्रमाणात ट्रेंडिंग झालेले दिसतील.

आता क पडय़ांनंतर आपण या वर्षीच्या अ‍ॅक्सेसरीज आणि ज्वेलरी ट्रेंड्सवर एक नजर टाकूयात. कपडय़ाला मॅचिंग रंगाचे आणि टेक्स्चरचे हेड बँडस, डेकोरेटिव्ह हेड प्रिंट्स किंवा मंकी कॅ प्स हे जास्त प्रमाणात बघायला मिळेल. बॅग्ज आणि पर्सेसबद्दल बोलायचं झालं तर बोहेमियन आणि ट्रायबल प्रिंट्सच्या बॅग्ज आणि सॅक्स या वर्षीही तितक्याच चर्चेत राहतील. मागच्या वर्षीप्रमाणेच कमरेला बांधायचे साइड पाऊचेस/वेस्ट पाऊचेसची अजून ट्रेण्डी आणि स्टायलिष आवृत्ती आपल्याला बघायला मिळेल. अजून एक महत्त्वाचा बॅग्जमधील ट्रेण्ड या वेळेस खूप चर्चेत असेल तो म्हणजे एकाच वेळेस एकाच डिजाईनच्या वेग वेगळ्या साइजच्या दोन-दोन बॅग्ज घेऊन तरुणी मिरवताना दिसतील. फुटवेअरचा विचार करता पार्टीवेअर म्हणून हाय हिल्सचे सँडल्स जास्त लोकप्रिय असतील, शिवाय ते हिल्स खास टॅसल्स, बीड्स आणि फ्रिं जेसने सजवलेले असतील. पुरुषांमध्येही सेमी फॉर्मल लेदर शूज, रंगीत कॅनव्हास शूजची चलती असेल या वर्षीप्रमाणेच पुढच्या वर्षीही स्त्रियांचा कल जास्त चंकी किंवा अँटिक पद्धतीच्या, रंगांच्या ज्वेलरीकडे दिसून येईल. पुरातन काळातील राजा-महाराजांच्या काळातील नाणी किंवा तत्सम वस्तूंच्या आकाराचे पेंड्ंट्स वापरून केलेले नेकलेस आणि इअररिंग्जही विशेष लक्षवेधक ठरतील.

हे होते येत्या वर्षांतील विशेष लोकप्रिय होतील असे काही ट्रेंड्स. या फॅ शनदारसदराची सुरुवात जानेवारीमध्ये केली तेव्हा हे वर्ष आणि या सदराच्या निमित्ताने साधलेला हा संवाद इतक्या झपाटय़ाने पुढे जाईल अशी कल्पनाही केली नव्हती. या सदराला तुमचा इतका चांगला प्रतिसाद मिळेल, असेही वाटले नव्हते; पण तुम्हाला या सदरातून फॅ शनबद्दल वाचताना जेवढी मजा आली त्याच्या कैकपट फॅ शनबद्दलची ही बाराखडी, या क्षेत्रातील बदल अशा वेगवेगळ्या विषयांवरची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला आली. वर्षभराचा हा फॅ शनच्या निमित्ताने रंगलेला संवाद सेतू आता इथेच थांबतो आहे. आजच्या लेखातून या वर्षांचा आणि तुम्हा वाचकांचा निरोप घेत असताना आपण पुढच्या वर्षीची फॅ शन चाहूल घेतली आहे. पुढच्या वर्षीचे फॅ शन र्ट्ेंड्सलक्षात घेऊन तुमची वाटचाल होईल. त्यासाठी येणारे नवीन वर्ष तुम्हाला असेच छान भरभराटीचे आणि फॅ शनमय जावो, हीच शुभेच्छा! तुम्हा सर्वाना नवीन वर्षांच्या शुभेच्छा!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 2:41 am

Web Title: fashion the ultimate new year eve fashion new years eve outfit
Next Stories
1 ब्रॅण्डनामा : ब्रॅण्डपूर्ती
2 बॉटम्स अप : भरपूर खा, थोडी प्या, मजा करा..
3 व्हिवा दिवा :  ऐश्वर्या परब
Just Now!
X