News Flash

‘पॉप्यु’लिस्ट : कठिणोत्तम गाणी

अमेरिकेत १९३० ते ५० या कालावधीत जे काऊबॉय सिनेमा आले, त्यामध्ये पहिल्यांदा यॉडलिंग वापरण्यात आले.

(संग्रहित छायाचित्र)

गाणी कशी असावीत, तर सहज गुणगुणता येणारी. भारतात आपल्या प्रादेशिक भाषेतील गाण्यांसह हिंदूी सिनेमांतील गाणी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हिट होण्यामागे त्यातील गुणगुणण्याची हलकीफुलकी सुविधा असते. पण भारतीय चित्रसंगीत यंत्रणेत किशोर कुमार या अवलियाने युरोपीय पर्वतांमध्ये लोकसंगीतात वापरल्या जाणाऱ्या यॉडलिंग शैलीचा वापर करून गायलेली हिंदी गाणी पहिल्यांदाच कठीणोत्तम गणली गेली. किशोर कुमार यांनी ६० ते ८०च्या दशकात यॉडलिंग गाण्यांनी धमाल उडवून दिली. त्या कालावधीत गाण्यांमध्ये आवाजी प्रयोग करण्याचे प्रकार आणि हरकती आर.डी.बर्मन यांनी गायलेल्या मोजक्या गाण्यांव्यतिरिक्त कुठे सापडू शकणार नाहीत. ए.आर. रेहमानच्या झंजावातासोबत रेमो फर्नाडिस यांनी चित्रविचित्र आवाजांची गंमत केली, कलोनियल कझिन्सनी (हरिहरन, लेझ्ले लुईस) शास्त्रीय स्वरखोडय़ा काढल्या. पण सर्वाधिक मान्यता मिळाली ती शंकर महादेवन यांना त्यांच्या ब्रेथलेस गाण्यासाठी. गाणी गाण्यातील कठीण प्रयोग म्हणून ब्रेथलेसद्वारे महादेवन यांना आयुष्याच्या अनिश्चित टप्प्यावर सूर गवसला. या एका गाण्याने त्यांना जगभर ओळख मिळाली आणि त्यांची कारकीर्द मुख्य प्रवाहात बहरत गेली.

अमेरिकेत १९३० ते ५० या कालावधीत जे काऊबॉय सिनेमा आले, त्यामध्ये पहिल्यांदा यॉडलिंग वापरण्यात आले. रॉय रॉजर्स या अभिनेत्या-गायकाची कित्येक गाणी आजही यूटय़ूबवरून ऐकता येतात. किशोर कुमार यांच्या यॉडलिंगमधील आदर्श या सिनेमांमधून आले असण्याची शक्यता आहे. काऊबॉय नाइट हर्ड साँग या गाण्यामध्ये रॉय रॉजर्स यांची यॉडलिंग शैली पडताळता येऊ शकेल. यॉडलिंगच नाही, तर आपल्या शास्त्रीय संगीतात ज्या प्रकारे स्वरांवर ताण देऊन आलाप, ताना आणि गानकसरती केल्या जातात, त्यांतील शेकडो गायनप्रधान गाणी प्रसिद्ध आहेत आणि दर वर्षी त्यात नव्याने भर पडत असते. ‘अनचेन्ड मेलडी’ हे गाणे १९६० च्या दशकामध्ये गायले गेले आहे. या निव्वळ रोमॅण्टिक गाण्याची आत्तापर्यंत ६५० व्हर्जन्स झाली असून राइचस ब्रदर्सचे व्हर्जन आपल्या कानांपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचलेले असते. प्रचंड मोठा आलाप घेऊन साकारलेले ‘ओ माय लव्ह, माय डार्लिग’ हे ‘द घोस्ट’ सिनेमातील भावपूर्ण व्हर्जन सर्वमान्य झाले आहे. हे गाणे ऐकायला सोपे असले, तरी त्यातील आलाप तंतोतंत गाण्यासाठी सोपा नाही. जगातल्या गायला कठीण गाण्यांमध्ये याचा समावेश होतो.

रेजिना स्पेक्टर हे नाव आपल्याकडे ब्रिटनी स्पिअर किंवा शकीरासारखे सुपरिचित नाही. पण तिची गाणी या नाणावलेल्या कलाकारांच्या अंगुळभर अधिक श्रवणीय आणि प्रयोगशील आहेत. तिची ‘अस’ ,‘हिरो’ या गाण्यांसोबत ‘फिडिलिटी’, ‘बेटर’ ही गाणी गायकी शैलीसाठी खास ऐकावीत. स्वरछेडीच्या सुंदर छटा तिच्या प्रत्येक गाण्यात असतात. स्वत: पियानोवादक असल्यामुळे तिच्या गाण्यांमधील अविभाज्य भाग हे वाद्य असते. यातील अनेक गाणी सहज गुणगुणता येणे सोपे नाही.

अलीकडे लोकप्रिय झालेली सिया या गायिकेच्या ‘चॅण्डलिअर’ या गाण्यामध्ये पट्टय़ांचा खेळ करण्यात आला आहे. गाणे कितीतरी वेळा कोरससह वेगवेगळ्या पट्टय़ांमध्ये फिरत राहते. ऐकणाऱ्याला आवाजातील ताकद आणि नजाकत कळते, मात्र त्यात गायकीचा प्रचंड मोठा कस उतरला आहे.

ब्रिटनी स्पिअर या कलावतीची गाणी दरएक दशकात ‘हिट मी बेबी वन मोअर टाइम’चा पुढचा भाग वाटतात. तिने अनेक श्रवणीय गाणी दिली असली, तरी २००९ च्या दरम्यानचे ‘वुमनायझर’ हे गाणे खास ऐकावे असे आहे. या गाण्याचे वैशिष्टय़ म्हणजे तिने तिची शैली मोडून त्या काळात अत्यंत लोकप्रिय असलेल्या लेडी गागाच्या गाण्यांसारखी गाण्यांमागून गाणी तयार केली होती. टॉक्सिकनंतरचे हे गाणेदेखील गुणगुणण्यास कठीण आहे. ही गाणी ऐकताना सोबत लेडी  गागाची गाणी ऐकल्यास सारी गाणी एकाच शैलीतील वाटतील. या कालावधीत इलेक्ट्रॉनिक्स डिस्को बीट्सनी धुमाकूळ घातला होता. आयरिश समूह ‘क्रॅनबेरीज’ हा रॉक बॅण्ड म्हणून प्रचलित असला, तरी त्यांची गाणी सर्वाधिक सॉफ्ट रॉक म्हणून प्रसिद्ध आहे. यातील लिंगर, झॉम्बी ही सुप्रसिद्ध गाणी गाणारी डलोरिस ओरिओडन या गायिकेला या वर्षांच्या सुरुवातीलाच अकाली मरण आले. या गायिकेच्या आवाजावर ओळखल्या जाणाऱ्या या बॅण्डचे ‘ड्रीम’ हे गाणे त्यातील मधे वापरण्यात आलेल्या आलापासाठी खास ऐकावा. आवाज किती चढवता येऊ शकतो, हे जाणण्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

कठीणोत्तम गाणी गाण्यास सोपी नसली, तरी ऐकण्यासाठी कानांना तोशीस पडू देत नाहीत, हे त्यांचे वैशिष्टय़ समान असल्यामुळे आपण चांगल्या गाण्याच्या आस्वादात गुंगून जाणे सर्वात महत्त्वाचे आहे. सध्या शब्द आणि चाल गरिबीने ग्रासलेल्या संगीत व्यवहारात तेच कठीण बनले आहे.

म्युझिक बॉक्स

Roy Rogers : The Cowboy Night Herd Song

The Righteous Brothers – Unchained Melody

Regina Spektor – “Fidelity”

Britney Spears – Womanizer

Lady Gaga – Judas

The Cranberries – Dreams

The Cranberries – When You’re Gone

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 3:18 am

Web Title: popular english song hollywood song most viewed english songs
Next Stories
1 कॅफे कल्चर : जिथे काळ थांबलाय!
2 ब्रॅण्डनामा : ब्रिटानिया
3 सुर्रर्र के पियो!
Just Now!
X