एखादी गोड बातमी समजली, कोणाचं कौतुक करायचं असेल किंवा देवाची आरती म्हणायची असेल तर आपसूकच आपले हात जोडले जातात आणि आपण टाळ्या वाजवायला लागतो. मात्र टाळ्या वाजवण्यामागे कोणतंही कारणं असलं तरी त्याचा फायदा हा आपल्या शरीरालाच होत असतो. टाळ्या वाजवताना आपल्या हाताचे तळवे एकमेकांवर आपटले जातात. विशेष म्हणजे शरीरात असलेल्या ३४० प्रेशर पॉइट्समधील २९ पॉईट्स हे हाताच्या तळव्यावर असतात. त्यामुळे  टाळ्या वाजवणे ही शरीरासाठी एक उत्तम थेरपी असल्याचं म्हटलं जातं. चला तर मग जाणून घेऊयात टाळ्या वाजवण्याचे फायदे-

१.दिवसातून रोज ४०० टाळ्या वाजवल्यामुळे संधिवात, आमवात यासारखे आजार बरे होण्यास मदत मिळते.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

२.टाळ्या वाजवल्यामुळे हातातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया जलद गतीने होते. परिणामी, रक्तदाब वाढतो. त्यामुळे हातातील नसांमधील रक्ताभिसरण सुरळीत होते.

३.हात थरथर कापणे, लकवा असणं अशा आजारात रोज सकाळी आणि संध्याकाळी शक्य होतील तितक्या टाळ्या वाजवाव्यात. हा प्रयोग २ ते ३ महिने दररोज करुन पाहावा.

४. हृदयरोग, फुफ्फुसाचा आजार, यकृताचा आजार यामध्ये टाळ्या वाजवल्यामुळे आराम मिळतो.

५. टाळ्या वाजवल्यामुळे शरीरातील रक्तसंचार वाढतो. परिणामी, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

६. डोकेदुखी, अस्थमा, मधुमेह नियंत्रणात राहते.

७. आपल्या हाताचा अंगठा, बोटांच्या शिरा या डोक्याशी जोडलेल्या असतात. त्यामुळे टाळ्या वाजवल्यामुळे त्याचा परिणाम शिरांच्या मार्फत डोक्यापर्यंत पोहोचत असतो.

त्यामुळे केसगळतीची समस्या असेल तर ती दूर होण्यास मदत मिळते.

८. कधीही टाळ्या वाजवण्यापूर्वी हाताला बदामाचं किंबा खोबऱ्याचं तेल लावावं.

९. टाळ्या वाजवल्याने लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना थेरपी करताना मदत होते.

१०. पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी क्लॅपिंग थेरपीचा फायदा होतो.