वीाो्शहरी जेवणातला अक्षरश: अविभाज्य भाग बनलेल्या ब्रेडचे भाव तीन रुपयांनी किंवा 13.6 टक्क्यांनी वाढले आहेत. एकीकडे किरकोळ महागाई घटत असल्याचे आकडे सांगत असताना, ही महागाई मात्र सर्वसामान्यांना भोगावी लागणार आहे. ब्रेड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने कच्च्या मालाचे भाव वाढल्याचे कारण देत शनिवारी ही भाववाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ब्रेड स्लाइसच्या लहान पॅकचा भाव तीन रुपयांनी व मोठ्या पॅकचा भाव चार रुपयांनी वाढला आहे.

विब्ज, ब्रिटानिया व मॉडर्न या तिनही प्रमुख कंपन्यांनी ब्रेडचे दर वाढवले आहेत. लहान पॅक किंवा 400 ग्रॅमच्या ब्रेडसाठी सध्याच्या 22 रुपयांऐवजी 25 रूपये मोजावे लागणार आहेत, तर 800 ग्रॅमच्या मोठ्या पॅकसाठी आता 44 रुपयांऐवजी 48 रुपये मोजावे लागणार आहेत. या बड्या कंपन्यांनी दरवाढ केली असल्याने स्थानिक पातळ्यांवरील लहानमोठे उद्योजकही ब्रेडचे भाव वाढवतील अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे मैद्याच्या दरात झालेली वाढ व महाराष्ट्र सरकारच्या प्लास्टिक बॅनमुळे ब्रेडच्या दरांमध्ये वाढ करण्यात येत असल्याचे या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सांगितले.

IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
st mahamandal marathi news, st digital payment marathi news
सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा, दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी

जो मैदा 18 रुपये किलो होता तो आता 26 रुपये किलो झाला आहे, तसेच इकोफ्रेंडली प्लास्टिकमुळेही उत्पादन खर्च वाढल्याचे आणि ही एकूण वाढ उत्पादक सोसू शकत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. नवीन नियमावलीमुळे प्लास्टिक पॅकिंगचा खर्च नवी नावं प्रिंट करण्याचा खर्च आदींमुळे लहान मोठे स्थानिक उत्पादकही एखाद दोन रूपयांनी ब्रेडचा दर वाढवतील असे एका व्यावसायिकानं सांगितलं आहे.

आत्तापर्यंत एखादा रूपया वाढायचा परंतु आता एकदम तीन रुपयांनी ही भाववाढ झाल्यामुळे सामान्य ग्राहक तसेच मोठ्या प्रमाणावर ब्रेड वापरणारे सँडविच विक्रेते यांना ही झळ बसणार आहे. त्यामुळे आज ना उद्या रस्त्यावरचं सँडविचदेखील महागलं तर आश्चर्य वाटायला नको.