Huawei ची सबब्रँड कंपनी Honor ने गेल्या आठवड्यातच आपला नवा स्मार्टफोन  ‘Honor 20i’ लाँच केला होता. आजपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. दुपारी १२ वाजेपासून या फोनच्या विक्रीसाठी फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर सेल सुरू होत आहे. याशिवाय ऑफलाइन म्हणजेच दुकानांतून देखील हा फोन खरेदी करता येणार आहे. मात्र, दुकानांमध्ये हा फोन केव्हापर्यंत उपलब्ध होईल याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

जिओच्या ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर माय जिओ अॅपद्वारे १९८ किंवा २९९ रुपयांचं रिचार्ज केल्यास २ हजार २०० रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि १२५ जीबीपर्यंत ४जी डाटा मिळेल.  याशिवाय बायबॅक ऑफर अंतर्गत ९० दिवसांमध्ये जर फोन परत केल्यास किंमतीच्या ९० टक्के पैसे परत मिळतील, तसंच नो-कॉस्ट इएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. मागील बाजूला आर्टिफिशियल इंटिलिजन्स (एआय) ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात २४ मेगापिक्सल, ८ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल असे कॅमेरे आहेत. कॅमेऱ्यामध्ये एन्टी शेक, सुपर स्लो-मोशन व्हिडिओ शुटिंग, प्रोफेशनल मोड, पोट्रेट मोड यासारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असे विविध फीचर्स आहेत.  फोनमध्ये किरीन ७१० एसओसी प्रोसेसर आहे. फोममध्ये ६ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटर्नल मेमरी आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे मेमरी आणखी वाढवू शकता. त्याशिवाय ‘Honor 20i’मध्ये ३४०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. फोनमध्ये रिअर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असून फेस अनलॉकची सुविधा आहे.

४ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये इतकी असून मिडनाइट ब्लॅक, फँटम ब्ल्यू आणि फँटम रेड या रंगांमध्ये हा फोन खरेदी करता येईल.