ख्रिसमसच्या सुट्ट्या हा ट्रीपला जाण्यासाठी उत्तम कालावधी असतो. ट्रीपला जायचं म्हटल्यावर त्यासाठी योग्यप्रकारे नियोजन करणेही आवश्यक आहे. समुद्रकिनारे असूद्या किंवा पर्वतशिखरे, तुम्हाला जिथे जायची इच्छा असेल तिथे जा. पण त्यासाठी पहिल्यांदा विमानाची तिकिटे काढणे आणि हॉटेल बुक करणे महत्वाचे आहे. तसाही आता गर्दीचा हंगाम आहे. आणि तुमच्या हातात पैसे नाहीत म्हणून ते तुमच्या नाताळच्या सुट्टीच्या आड येऊ देऊ नका. तुमच्या बचतीला हात न लावता या ट्रीपसाठी पैसे कसे उभे करता येतील याचे काही पर्याय पाहूयात…

क्रेडिट कार्डचा पर्याय निवडा

Solar Ac That Does Cooling at Home Using Sun Energy Cost of Ac for 1 to 1.5 Ton
सोलार एसी वापरून सूर्यावर खेळ रिव्हर्स कार्ड! किंमत, फायदे पाहाच, आधीच घरी एसी असल्यासही करू शकता जुगाड
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
SSC CHSL 2024 Recruitment OTR and Application Module
SSC CHSL 2024 Recruitment: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! अर्ज करताना OTR आणि Live फोटो काढणे आवश्यक
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..

क्रेडिट कार्डमुळे तुम्हाला आधी खर्च करून नंतर त्याचे पैसे देता येतात. क्रेडिट कार्डने तुमची विमानाची तिकिटे बुक करा, राहण्यासाठीचे आणि आपल्या जेवणासाठीचे पैसे द्या कारण निधीची व्यवस्था करण्यासाठी आणि बिलाची रक्कम चुकविण्यासाठी स्टेटमेंट कालावधीच्या शेवटच्या दिवसापासून तुम्हाला 25-दिवस व्याजमुक्त कालावधी मिळेल. तुम्हाला जर बिलाची संपूर्ण रक्कम भरता आली नाही, तर तुम्ही ती काही अंशी भरू शकता आणि फक्त बाकी असलेल्या रकमेवरच व्याज भरावे लागते. या सर्व प्रक्रियेत तुम्हाला खरेदीवर डिस्काऊंट मिळण्याची शक्यता असते. यामध्ये कॅशबॅक, रिवॉर्ड पॉईंट्‌स मिळतात.

तुमचा वर्षाखेरीचा बोनस

वर्षाची हीच ती वेळ असते जेव्हा तुम्हाला बोनस मिळत असतो. अशावेळी तुम्ही अचानक सुट्टीची योजना बनवली असेल तर तुमच्या हातात बोनसच्या रुपाने जास्तीचे पैसे असतात. त्यामुळे अशावेळी तुमच्या बँकेतील पैशाला हात न लावता किंवा कर्ज न घेता या बोनसचा बिनधास्त वापर करा.

कर्ज घेणे

काही कंपन्या कमी व्याजदराने किंवा बिनव्याजी काही महिन्यांसाठी कर्जाच्या रूपाने आगाऊ पगार देतात. अशा प्रकारची कर्जे नंतर पुढील काही महिन्यांच्या पगारातून वसूल केली जातात. परंतु यासाठी तुम्हाला कर भरावा लागणार आहे की नाही याचा नीट विचार करा.

प्रवासासाठीचे कर्ज

ट्रॅव्हल लोन्स म्हणजे पर्सनल लोन्सचाच एक प्रकार असतो, ज्यातून तुम्हाला १०,००० रुपयांपासून ते २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. जर तुमची कर्जाची रक्कम २ लाखांपेक्षा कमी असेल, तर त्यासाठी कोणतेही तारण किंवा जामीनदार देण्याची गरज नसते. विशेषत:, तुमचा क्रेडिट स्कोअर जर चांगला म्हणजे ७५०च्या वर असेल, तर तुम्हाला कर्ज सहजपणे मंजूर होते. परंतु असे कर्ज घेण्यापूर्वी त्याच्याशी जोडलेले व्याज, प्रक्रिया शुल्क, इत्यादी विचारात घ्या.

ट्रॅव्हल ऑपरेटरच्या माध्यमातून ईएमआय फायनान्सिंग

अनेक ट्रॅव्हल ऑपरेटर्स आणि ॲग्रिगेटर्स आधी तुम्हाला प्रवास करून नंतर तुमच्या सोयीनुसार हप्त्यांनी पैसे भरण्याची मुभा देतात. यामुळे तुमची एकरकमी पैसे भरण्यातून सुटका होते. हे ट्रॅव्हल ऑपरेटर्स अशा योजनांसाठीचे पैसे एनबीएफसीज्‌ आणि वित्तीय संस्थांशी टाय-अप करून उभे करतात. तुमची ट्रॅव्हल तिकिटे, खाणेपिणे, साईटसिईंग, राहण्याची व्यवस्था आणि सेवा कर हे सर्व ह्या योजनांमध्ये समाविष्ट असते.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार