07 December 2019

News Flash

सुझुकी जिक्सर एसएफ 250 ची MotoGP आवृत्ती लाँच, ‘ही’ आहे किंमत

क्लिप-ऑन हँडलबारमुळे या बाइकची रायडिंग पोझिशन अधिक अग्रेसिव्ह

Suzuki मोटरसायकल्स इंडियाने (Suzuki Motorcycle India)भारतात सुझुकी जिक्सर एसएफ 250 ची नवीन आवृत्ती म्हणजेच मोटोजीपी एडिशन लाँच केली आहे. ही नवी आवृत्ती रेसिंग ब्ल्यू पेंट स्कीमसह सादर करण्यात आली आहे. मे महिन्यात सर्वप्रथम कंपनीने ही बाइक भारतीय बाजारात लाँच केली होती. या बाइकसोबतच कंपनीने 250सीसी प्रकारातील दुचाकी बाजारात प्रवेश केला होता. आता यातील नवी आवृत्ती लाँच करण्यात आली आहे. रेसिंग स्टाइल असलेली ही बाइक क्लिप-ऑन हँडलबारमुळे या बाइकची रायडिंग पोझिशन अधिक अग्रेसिव्ह (आक्रमक) दिसतेय.

Gixxer SF 250 बाइकमध्ये एलईडी हेडलाइट्स, क्लिपऑन हँडलबार, स्पिलट सीट्स आणि मल्टी-स्पोक 17 इंच अॅलॉय व्हिल्स आहेत. बाइकमध्ये पूर्णतः डिजिटल इंस्ट्रुमेंट पॅनल आहे. ड्युअल एग्झॉस्ट सिस्टिम आहे. सुझुकीच्या या स्पोर्ट्स बाइकच्या पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि रिअरमध्ये मोनोशॉक सस्पेंशन आहेत. दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक आहेत. ड्युअल चॅनल एबीएस हे फीचर देखील बाइकमध्ये आहे. 12 लिटरची पेट्रोल टाकी असलेल्या या बाइकचं वजन 161 किलो आहे. शार्प फेअरिंगमुळे बाइक आकर्षक दिसतेय.

इंजिन –
Gixxer SF 250 बाइकमध्ये 249cc सिंगल-सिलिंडर, ऑइल-कुल्ड, फ्युअल इंजेक्टेड SOHC इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 9000 rpm वर 26 bhp पावर आणि 7500 rpm वर 22.6 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्सचा पर्याय आहे.

टक्कर –
सुझुकीच्या ही बाइक सध्या बाजारात असलेल्या बजाज पल्सर आरएस 200, बजाज डॉमिनर 400, केटीएम आरसी 200, यामाहा फेझर 25, Honda CBR250R ABS अशा गाड्यांना थेट टक्कर देईल.

किंमत – मोटोजीपी आवृत्तीची किंमतही इतर सामान्य व्हेरिअंट्स इतकीच अर्थात 1.71 लाख रुपये(एक्स-शोरुम) आहे.

 

 

 

First Published on August 13, 2019 3:20 pm

Web Title: suzuki gixxer sf 250 motogp edition launched in india know price and all specifications sas 89
Just Now!
X