21 October 2018

News Flash

‘हे’ आहेत व्होडाफोनचे बदललेले प्लॅन्स

त्याच किंमतीत मिळणार जास्त इंटरनेट डेटा

रिलायन्स जिओ आणि त्याबरोबरच बाजारात सुरु असलेल्या स्पर्धेत आपला टिकाव लागावा यासाठी टेलिकॉम कंपन्या एकाहून एक ऑफर्स जाहीर करत आहेत. जिओ आणि एअरटेलने नुकतेच आपल्या काही प्लॅनमध्ये बदल केल्यानंतर आता व्होडाफनही या स्पर्धेत उतरली आहे. देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्होडाफोनतर्फे कायमच आपल्या यूजर्सना विविध प्लॅन्स देऊन खूश केले जाते. त्याचप्रमाणे व्होडाफोननेही आपल्या २ प्लॅनमध्ये बदल केले असून व्होडाफोनची सुविधा वापरणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या नव्या प्लॅनमुळे जिओ, आयडीया, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहे. व्होडाफोनचे हे प्लॅन व्होडाफोनच्या अधिकृत वेबसाईट आणि माय व्होडाफोन अॅपवर उपलब्ध असतील.

व्होडाफोनने आपल्या ४५८ आणि ५०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केले असून या प्लॅनमध्ये देण्यात येणारा डेटा वाढविण्यात येणार आहे. याबरोबरच या दोन्ही प्लॅनची वैधताही वाढविण्यात येणार आहे. ४५८ रुपयांच्या प्लॅनमध्ये आतापर्यंत ७० दिवसांची वैधता होती ती वाढवून ८४ दिवसांची मिळणार आहे. या प्लॅनमध्ये रोज १ जीबी डेटा मिळत होता ८४ दिवस वैधता झाल्याने आता त्याच किंमतीत ८४ जीबी डेटा मिळणार आहे. ५०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता असल्याने ८४ जीबी डेटा मिळत होता. याची मर्यादा आता वाढविण्यात आली असून ५०९ रुपयांचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना ९१ दिवसांची वैधता आणि ९१ जीबी डेटा मिळणार आहे.

एअरटेलने नुकतेच आपले प्लॅन बदलले आहेत. १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये आधी केवळ पहिल्या महिन्याला १ जीबी ३ जी डेटा मिळत होता. मात्र आता एअरटेलने त्याच किंमतीत कायम १ जीबी डेटा देणार असल्याचे सांगितले आहे. ३४९ च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ जीबी डेटा देण्यात येणार होता मात्र आता रोज २ जीबी डेटा दिला जातो. ४४८ च्या प्लॅनची वैधता ८२ दिवस कऱण्यात आली आहे. जिओनेही आपल्या काही प्लॅन्समध्ये बदल केले आहेत. १ जीबी डेटाच्या प्लॅनची किंमत कंपनीने ६० रूपयांवरून ५० रूपयांवर आणली आहे. तर २८ जीबी डेटाचा प्लॅन १९९ ऐवजी आता १४९ रूपयात मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवस असेल. ७०जीबी डेटा प्लॅनदेखील आता ३९९ ऐवजी ३४९ रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी ७० दिवसांची आहे.

First Published on January 10, 2018 12:12 pm

Web Title: vodafone has change their plans 458 and 509 more validity and data