पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये वर्षानुवर्षे सर्वोत्तम औषधी म्हणून पिवळ्याधमक हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणारी ही हळद आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे.
विविध आजारांपासून रक्षण करणारी ही हळद आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेत असते, असे म्हटले जाते. मात्र, हळदीच्या गुणधर्मांचा शरीरासाठी फायदा करून घेताना दोन गट पडतात. एका पद्धतीत लोक आरामदायी दुधात हळदीचा वापर केल्यास ती जास्त उपयुक्त ठरत असल्याचे मानतात. तर, दुसरीकडे हळदयुक्त पाणी पिणारे लोक त्या पद्धतीवर अधिक भर देतात. त्यामुळे नेमकी कोणती पद्धत अधिक फायदेशीर आहे, असा प्रश्न उभा राहतो.

हैदराबादमधील केअर हॉस्पिटल्स, बंजारा हिल्स येथील, क्लिनिकल डायेटिशियन जी. सुषमा [G Sushma] यांच्या मते ही निवड प्रत्येक व्यक्ती आणि तिच्या वैयक्तिक गरजांवर आधारित असते. त्यांना कोणत्या पेयातून कोणते फायदे मिळवायचे आहेत हे त्या पेयावर अवलंबून असते, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून मिळते.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Health Benefits of Lassi
तुम्ही उन्हाळ्यात रोज ताक किंवा लस्सी प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक

हेही वाचा : रक्तातील साखर नियंत्रित ठेवेल ‘हे’ फळ! मधुमेहींनी उन्हाळ्यात आवर्जून खावे ‘जाम’; लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला….

हळदीच्या दुधाचे फायदे –

आहारतज्ज्ञ सुषमा यांनी हळदीच्या दुधाचे सांगितलेले फायदे पाहा.

अँटीइम्फ्लेमेट्री घटक

हळदीमध्ये दाहविरोधक [अँटीइम्फ्लेमेट्री] गुण असणारा कर्क्युमिन [curcumin] नावाचा घटक असतो. त्यामुळे दुधात हळद मिसळून प्यायल्याने संधिवात, सांधेदुखी यांसारख्या दाहसंबंधित आजारावर हे पेय गुणकारी ठरू शकते.

रोगप्रतिकार शक्तीत वाढ

हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असून, त्याचा फायदा रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होत असतो. त्यामुळे दररोज हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढून, शरीर कोणत्याही संसर्ग आणि आजारांना लढण्यासाठी तयार होते.

पचन सुधारण्यास मदत

हळद पित्ताशयाला अन्नपचनासाठी आवश्यक असणारे पित्त तयार करण्यासाठी उत्तेजित करते. त्यामुळे हळदीचे दूध हे अपचन, पोट फुगणे, गॅस यांसारख्या पचनासंबंधी समस्या दूर करण्यास मदत करू शकते.

उत्तम झोपेसाठी मदत

कोमट दूध त्याच्या आरामदायी गुणधर्मासाठी ओळखले जाते. दूध जेव्हा हळदीसह एकत्रित केले जाते, तेव्हा शरीराला अधिक आराम मिळतो. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास फायदा होतो.

कर्करोग प्रतिबंधक

हळदीमध्ये असणाऱ्या कर्क्युमिनचा फायदा हा कर्करोग प्रतिबंधित करण्यासाठीही [कदाचित] फायदेशीर ठरू शकतो , असे आहारतज्ज्ञ सुषमा यांनी सांगितल्याचे द इंडियन एक्सप्रेसच्या लेखावरून समजते. कर्क्युमिनमध्ये कर्करोगाविरुद्ध लढण्याचे गुणधर्म असू शकतात, असे काही अभ्यासातून समोर आल्याचे त्या म्हणतात.

हेही वाचा : तुम्ही ‘बनावटी’ ORS तर पीत नाही ना? ‘शारीरिक त्रास ते मेंदूला सूज’, होऊ शकतात गंभीर समस्या! डॉक्टरांचा सल्ला पाहा

हळदी दुधाचे सेवन कुणी करू नये?

पित्ताशय समस्याग्रस्त व्यक्ती

हळद ही पचनासाठी पित्त उत्तेजित करण्यास मदत करते. त्यामुळे पित्ताशयाच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींमध्ये पित्ताशयाच्या समस्या वाढून ते त्रासदायक ठरू शकते.

रक्त पातळ करणारी औषधे सुरू असणाऱ्या व्यक्ती

हळदीमध्ये नैसर्गिकरीत्या रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे जे अशा प्रकारची औषधे घेत असतील, त्यांनी हळदी दुधाच्या सेवनापूर्वी डॉक्टरांचा वा वैद्यकीय सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

हळद पाणी पिण्याचे फायदे

आयुर्वेदात, तसेच पारंपरिक भारतीय औषधींमध्ये पाण्यात हळद मिसळून पिण्याची पद्धत चांगलीच प्रचलित आहे. हळद पाणी पिण्याचेसुद्धा फायदे असल्याचे आहारतज्ज्ञ सुषमा सांगतात.

डिटॉक्ससाठी फायदेशीर

हळदीमध्ये ‘डिटॉक्सिफिकेशन’ गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. डिटॉक्सिफिकेशनमध्ये हळद यकृत आणि शरीरातील अनावश्यक घटकांना बाहेर काढते आणि संपूर्ण शरीर आतून स्वच्छ करण्याचे काम करते.

वजन नियंत्रणास उपयुक्त

हळदीमध्ये असणारा कर्क्युमिन हा घटक चयापचय क्रिया नियंत्रित करून, वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतो. तसेच तो शरीराची जळजळ वा दाह कमी करतो.

त्वचेच्या आरोग्यात सुधारणा

हळदीचे पाणी पिण्याने त्वचा तजेलदार आणि नितळ होण्यास मदत होऊ शकते. हळदीमध्ये अँटीइम्फ्लेमेट्री आणि अँटिऑक्सिडंट्स घटक असल्याने त्वचेला त्याचा फायदा होऊ शकतो.

पचनास उपयुक्त

हळदी दुधाप्रमाणेच हळद पाणीदेखील पचन सुधारण्यास मदत करू शकते. हळद पाणीदेखील पित्ताशयातील पित्त उत्पादनास प्रोत्साहन देऊन, पचनास उपयुक्त ठरू शकते.

हेही वाचा : तुम्हीही झोपेतून उठल्यावर डोळ्यांवर पाणी मारताय? ही सवय ठरू शकते हानिकारक! डॉक्टरांनी दिलाय सल्ला

हळद पाण्याचे सेवन कुणी करू नये?

किडनी स्टोन / मूतखडा असणाऱ्या व्यक्ती

हळदीमध्ये ऑक्झिलेट्स घटक असतात. त्यामुळे अतिसंवेदनशील व्यक्तींमध्ये पुन्हा किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता असते.

गर्भवती महिला

कमी प्रमाणातील हळदीचे सेवन जरी सुरक्षित असले तरी गर्भवती स्त्रियांनी याचा अतिरिक्त वापर करू नये.

कोणी काय निवडावे?

हळदी दूध

ज्यांना रात्रीच्या वेळी आरामदायी पेय प्यायचे असेल त्यांनी हळदी दुधाची निवड करावी. ज्यांना जळजळ किंवा तत्सम समस्या असतील, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असेल वा झोपेची समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी हळदी दूध गुणकारी असल्याचे आहारतज्ज्ञ सुषमा म्हणतात.

हळद पाणी

ज्यांना सौम्य पेय पिणे आवडते किंवा ज्यांना डिटॉक्सिफिकेशनवर आणि वजन नियंत्रणावर भर द्यायचा आहे अशा व्यक्तींनी हळद पाण्याची निवड करावी. ज्यांना दूध उत्पादनाच्या सेवनापासून त्रास होतो, जे लॅक्टोज इंटॉलरन्ट आहेत अशांसाठीही हळद पाणी हा उत्तम पर्याय आहे.