Health Special वृ्द्धापकाळातील सगळ्या बदलांची व्याप्ती मोठी आणि त्यांचे परिणामही अनेक. त्यामुळेच बरेच वेळा एखाद्या वृद्ध व्यक्तीमध्ये होणारे बदल हे स्वाभाविक असतात, ते वयोमानानुसारच आहेत असे कुटुंबीयांना वाटते. परंतु सगळेच काही नॉर्मल नसते. हळू हळू घडणारे बदल कधीकधी तीव्र होतात, त्यांचे स्वरूप बदलते. शारीरिक विकार, वृद्धापकाळात होणारे मानसिक बदल आणि कमी होत जाणाऱ्या बौद्धिक क्षमता या सगळ्याकडे सजगपणे पाहावे लागते. जेव्हा बौद्धिक क्षमतांचा ऱ्हास होऊ लागतो, म्हणजे विस्मरण होऊ लागते, भाषेवर परिणाम होतो, निर्णयक्षमता कमी होते, हिशोब चुकू लागतात, दिशांचे भान राहात नाही, एखादी कृती नियोजनपूर्वक पार पाडता येत नाही; तेव्हा त्या व्यक्तीस स्मृतिभ्रंश (Dementia) झाला असे म्हणतात…

जसे वय वाढते, तसे शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल घडतात, हे आपण सर्व जाणतोच. चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागल्या, दात पडू लागले, केस पांढरे झाले, दृष्टी मोतिबिंदूमुळे अधू होऊ लागली की, सर्वसामान्यपणे वय होऊ लागले असे मनात येऊन जाते. या बाह्य बदलांबरोबरच शरीर क्रियांवरही परिणाम होतो. नेहमीची कामे करण्याचासुद्धा वेग कमी होतो, इंद्रियांची संवेदनशीलता कमी होऊ लागते. अनेक कामे एकाच वेळेस करण्याची क्षमता कमी होते. काही प्रमाणात गोष्टी विसरायला होते, नवीन गोष्टी उदा. कॉम्प्युटर, शिकणे कठीण होते. अनेक व्याधी जडतात ते वेगळेच. उच्च रक्तदाब (hypertension), मधुमेह (diabetes mellitus), हृदयविकार (Heart disease), संधिवात (osteoarthritis), पक्षाघात (paralysis/ hemiplegia/ stroke), कंपवात (Parkinson’s disease) हे त्यापैकी काही…

health benefits of kundru
‘या’ १०० ग्रॅम फळभाजीच्या सेवनाने झपाट्याने वजन होईल कमी; हृदय राहील निरोगी, ठणठणीत!
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Heeramandi Dark History
स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
narendra modi
“मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींकडून भूमिका स्पष्ट

हेही वाचा…‘या’ १०० ग्रॅम फळभाजीच्या सेवनाने झपाट्याने वजन होईल कमी; हृदय राहील निरोगी, ठणठणीत!

बौद्धिक क्षमतांबरोबरच स्वभावामध्येही बदल होतो. दैनंदिन जीवनावर व दिनक्रमावर परिणाम होतो, उदा. एकट्याने प्रवास करणे, आर्थिक व्यवहार करणे, स्वयंपाक करणे, तसेच जेवणे, कपडे घालणे, आंघोळ करणे आदी. शरदराव बाजारात भाजी आणायला गेले होते. बराच वेळ झाला, तरी घरी परतले नाहीत म्हणून त्यांचा मुलगा त्यांना शोधायला घराबाहेर पडला. तो कोपऱ्यावर पोहचतो न पोहचतो तोच शेजारच्या बिल्डिंग मधला मित्र त्यांना घेऊन येताना दिसला. तो म्हणाला, “अरे, काका मला पार पुलापलीकडे भेटले! गोंधळलेले दिसले. आपण कुठे आहोत, याचे त्यांना भान नव्हते.

भाजीची पिशवी रिकामीच होती”… गेल्या दोन महिन्यात असे दुसऱ्यांदा घडले होते. घरच्यांना काळजी वाटू लागली आणि ते डॉक्टरांकडे गेले.

“अरे, वर्षानुवर्षे मी स्वेटर विणत आले, पण आज मला काही केल्या जमेना. सतत चुका झाल्या. टाके मोजायला चुकले, वीण चुकली आणि सगळे उसवून टाकावे लागले”, आई मोठ्या खेदाने सांगत होती. डॉक्टरांकडे नेले, त्यांच्याकडे गेल्यावर सुरुवातीला त्यांनी समजूत काढली, “अहो, वयाप्रमाणे असे व्हायचेच”. तीन महिन्यांनी आईला डॉक्टरांकडे पुन्हा न्यायची वेळ आली, कारण आईच्या वारंवार स्वयंपाकात चुका होऊ लागल्या. इतकेच नाही तर ती औषधे घ्यायला विसरू लागली आणि काही वेळेस तर जेवायलाच विसरू लागली…

हेही वाचा…तुम्ही हळदी दूध प्यावे की हळदीचे पाणी? कोणत्या पेयाचा होतो सर्वाधिक फायदा; घ्या जाणून….

माधवराव रिटायर होऊन वर्ष ही झाले नव्हते पण हल्ली त्यांचा पूर्वीसारखा उत्साह राहिला नव्हता. घरातून बाहेर पडेनासे झाले होते. एकटे बसून राहायचे. टीव्ही पाहणेही कमी केले होते. त्यांच्या पत्नीला वाटे आता तर खरे एकमेकांच्या सहवासात मजेत दिवस घालवायचे तर असे काय हे करतात? हळूहळू माधवरावांच्या हातापायला कंप सुटू लागला. चेहेऱ्यावरचे भावच नाहीसे झाले. हालचाली अतिशय हळू झाल्या. कंपवाताचे (Parkinson’s disease) निदानझाले. काही महिन्यांनी अनेक गोष्टी ते विसरू लागले… परंतु तरीही हळूहळू चालत अनेक वर्षांच्या शिरस्त्याप्रमाणे कोपऱ्यावरच्या दुकानातून दूध आणि समोरून वृत्तपत्र न चुकता विकत आणत. त्यांच्या पत्नीला त्यांच्या विकारामुळे काळजी वाटे. एक दिवस आपल्या घरी न जाता ते वरच्या मजल्यावर गेले आणि गोंधळून उभे राहिले. आता मात्र पुन्हा एकदा अनेक तपासण्या करण्याची वेळ आली होती…

हेही वाचा…मेंढी आणि शेळीच्या चीजबद्दल कधी ऐकलंय का? दररोज करू शकता सेवन; फायदे, तोटे सांगत तज्ज्ञांनी दिले उत्तर

वरील तीनही उदाहरणांमध्ये वेगवेगळ्या रक्ताच्या तपासण्या आणि CT Scan/ MRI केल्यानंतर डिमेन्शियाचे (Dementia) निदान झाले व योग्य ते उपचार सुरू झाले. डॉक्टरांच्याकडे एक ७५ वर्षांचे गृहस्थ आले. “डॉक्टर, हल्ली मी फार विसरतो. काल घडलेली गोष्ट आज लक्षात राहात नाही. तीन गोष्टी आणायला बाजारात जातो आणि एकच घेऊन परत येतो. परवा तर बँकेत गेलो आणि लक्षात आले चेकबुकच आणले नाही. माझी स्मरणशक्ती तपासून पहा. बाकी मी पूर्णपणे व्यवस्थित आहे. पण मला मनात भीती वाटते की, आपल्याला Dementia तर झालेला नाही ना? माझ्या चुलत भावाला dementia झालेला मी पाहिला आहे.” डॉक्टरांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि खरोखरच स्मरणशक्तीच्या चाचण्या, रक्ताच्या तपासण्या आणि MRI Scan करून घेतला. डिमेन्शियाचे तर निदान झाले नाही परंतु ‘सौम्य बौद्धिक ऱ्हास’ (Mild Cognitive Impairment) असल्याचे लक्षात आले. दर सहा महिन्यांनी तपासण्या करण्याचे ठरले. अशी विविध लक्षणे घेऊन आपल्यासमोर येणारा स्मृतिभ्रंश. त्याच्या विषयीची अधिक माहिती पुढील लेखात पाहू.