Yoga for High Blood Pressure : दररोजच्या धावपळीत आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या वाढताना दिसता आहे. रक्तदाब वाढणे ही त्यातली एक समस्या. अनुवांशिकताशिवाय, व्यायामाचा अभाव, अति तणाव, नीट आहार न घेणे, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, स्थूलता इत्यादी कारणांमुळे उच्च रक्तदाबाची समस्या दिसून येते. तुम्हाला जर उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही नियमित व्यायाम किंवा योगा केला पाहिजे. याविषयी योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी तीन गोष्टींचा रोज सराव करण्यास सांगितले आहे. आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

योग अभ्यासक मृणालिनी तीन गोष्टींचा सराव करण्यास सांगतात आणि खालील योगासने करून सुद्धा दाखवतात.

१. अनुलोम- विलोम प्राणायाम – ५ ते १० मिनिटे
२. भ्रामरी प्राणायाम – ३ ते ५ मिनिटे
३. ओम उच्चारण – ११ वेळा

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : तरुणाला आजूबाजूला दिसते करीना; मानसोपचार तज्ज्ञांकडून जाणून घ्या, नेमका हा प्रकार काय?

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रक्तदाबाचा त्रास म्हातारपणात होतो, असे लोकांना वाटते पण बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि खराब सवयी यांमुळे आता कोणत्याही वयोगटाच्या लोकांना हा त्रास जाणवू शकतो.
हा त्रास नियंत्रणात न राहिल्यास पुढे जाऊन हृदय, किडनी आणि मेंदूला सुद्धा इजा पोहचु शकते. उच्च रक्तदाब असलेल्या माणसाच्या धमन्यांमध्ये जास्त तणाव निर्माण होतो.
सामान्यत: रक्तदाब १२०/८० असतो. त्याहून जास्त आणि १३९/८९ पर्यंतचा रक्त दाब “पूर्व उच्च रक्तदाब” म्हणून ओळखला जातो आणि १४०/९० पेक्षा अधिक रक्तदाब “उच्च रक्तदाब” म्हणून ओळखला जातो.”

त्या पुढे सांगतात, “उच्च रक्तदाब नियंत्रित आणण्यासाठी खालील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  1. निरोगी आहार
  2. तणावाचे नियोजन करणे
  3. मद्यपान व धूम्रपान टाळणे
  4. वजन नियंत्रित ठेवणे
  5. नियमित व्यायाम व प्राणायाम करणे
  6. डॉक्टरांचा सल्ला घेणे

अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला. काही युजर्सनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली” तर काही युजर्सनी प्रश्न सुद्धा विचारली आहेत. एका युजरने विचारलेय, “रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढले आहे, त्यासाठी काय करावे?” तर एका युजरने विचारलेय,”एन्झायटी किंवा पॅनिक अटॅकची समस्या आहे त्याला रामबाण उपाय सांगा”