Mother’s Day 2024 Unique Gift Ideas: ‘आई’ हा शब्द जगातील अतिशय प्रेमळ आणि सुंदर शब्द आहे. आई हा शब्द जरी साधा, सोपा वाटला तरी संपूर्ण जगाला सामावून घेण्याची ताकद या शब्दात आहे. आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. पण आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आई आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका निभावते. ती आपली पहिली शिक्षिका असते, जी आपल्याला जीवन जगण्याचे पाठ शिकवते. आईचे प्रेम हे जगातील सर्वात निस्वार्थ आणि पवित्र प्रेम आहे. आई आपल्या मुलांवर कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करते. ती आपल्या मुलांच्या सुखासाठी सर्वस्व अर्पण करते.

मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे (Mother’s Day) संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. काही देश वेगवेगळ्या तारखांना हा दिवस साजरा करतात, पण भारत, अमेरिका (यूएसए), कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह काही देशांमध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जातो. मदर्स डे म्हणजेच मातृदिन यंदा १२ मे २०२४ रोजी साजरा होणार आहे. या दिवशी कोणी आपल्या आईला छानसं गिफ्ट देऊन हा दिवस आपल्या आईसाठी साजरा करतो. तर आज आम्ही तुमच्यासाठी भन्नाट भेटवस्तू घेऊन आले आहोत, जे तुम्ही तुमच्या यंदाच्या मातृदिनाला तुमच्या आईला भेट म्हणून देऊ शकता. चला तर जाणून घेऊया…

beer bathing
बिअर बाथिंग म्हणजे काय? त्यामुळे आरोग्याला खरंच फायदे होतात का?
Optical Illusion Personality Test
Optical Illusion: तुमचा स्वभाव सांगू शकते ‘हे’ चित्र, सर्वात आधी नजरेत कोणती गोष्ट आली यावरून ओळखा तुमच्या कामाची पद्धत
Loksatta anyatha spain Segovia Toledo is a beautiful hilltop village
अन्यथा: सुशांत आणि समजूतदार
Beetroot Juice Benefits
बीटाचा रस पिण्याचे फायदे वाचलेत का? ‘या’ वयोगटातील महिलांना होऊ शकतो मोठा लाभ; अभ्यासात सांगितले आहे ‘हे’ योग्य प्रमाण
"Beautiful handwriting
“मोत्यापेक्षा सुंदर अक्षर!”, दुसरीत शिकणाऱ्या चिमुकलीचं हस्ताक्षर ठरतोय चर्चेचा विषय, Viral Video एकदा बघाच
List of Major Women Empowerment Schemes in India in Marathi
Women Empowerment Schemes : भारतामध्ये महिला आणि मुलांसाठी कोणकोणत्या योजना राबवल्या जातात? घ्या जाणून…
Man Lost 13kgs In 21 Days With Water Diet
२१ दिवसांत १३ किलो वजन घटवणारा ‘मिलर’ आला चर्चेत! वजन कमी करण्यासाठी वापरलेला ‘हा’ फंडा तुम्हाला साजेसा आहे का?
Never Eat These Food Items With Tea
चहाच्या घोटासह चुकूनही खाऊ नका हे ६ पदार्थ; अचानक पोटात पित्त का वाढतं हे आहार तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊया

‘मदर्स डे’ निमित्त आईला गिफ्ट म्हणून देऊ शकता ‘हे’ बेस्ट पर्याय

१. तुमचा आणि तुमच्या आईचा फोटो

यंदाच्या मदर्स डे ला तुमच्या आईला खुश करण्यासाठी तुम्ही छानसं फोटो फ्रेम भेट देऊ शकता. त्यात विशेष संदेश लिहून तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो आईला भेट म्हणून देऊ शकता. आईचा जुना फोटो असेल तर आणखीनच छान, यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

२. साडी

साडी हा महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. साडी ही खरं तर आपल्याकडे सर्वात सुंदर पोशाख म्हणून ओळखली जाते. साडी नेसल्यानंतर प्रत्येक महिला ही सुंदरच दिसते. मग यंदाच्या मदर्स डे ला तुमच्या आईला तुम्ही साडी भेट देऊ शकता. त्यात तुमच्या आईचा आवडता रंग असेल तर आणखीनच छान…

३. पाक कृतींचे पुस्तक

आईला स्वयंपाकात नवे नवे पदार्थ बनविण्यासाठी तुम्ही तिला एखादं पाक कृतींचं पुस्तक भेट म्हणून देऊ शकता.

४. स्मार्टफोन

यंदाच्या मदर्स डे ला तुमच्या आईला तुम्ही नवा स्मार्टफोनही भेट म्हणून देऊ शकता.

५. पर्स

तुम्ही तुमच्या आईला अतिशय सुंदर दिसणारी अशी हॅन्ड बॅग भेट देऊ शकता. अशाप्रकारच्या रंगीबिरंगी पर्स बाजारात उपलब्ध आहेत.

६. योगा मॅट

योगा करणाऱ्यांसाठी योगा मॅट खूप महत्त्वाची आहे. तुमच्या आईचं आरोग्य जपण्यासाठी तुम्ही आईला योगा मॅट भेट म्हणून देऊ शकता.