नव्याने आलेल्या ‘फोर जी’ तंत्रज्ञानात १०० मेगाबाईट ते एक गिगाबाईट इतकी उच्च ऊर्जा असलेली विकिरणे वापरत असल्यामुळे ती मानवी मेंदूला व मज्जासंस्थेला धोकादायक असल्याचा निष्कर्ष ‘क्लिनिकल जर्नल ऑफ न्युरोलॉजी’ यात प्रकाशित झाला आहे.
मानवी मेंदू कमी कंपनांच्या लहरी तयार करतात आणि ग्रहण करतात. आपले शरीरही विद्युत तरंगांवर कार्य करते, पण तीव्र ऊर्जा उत्सर्जित करणारे विकिरण शारीरिक कार्यात अडथळे निर्माण करतात. म्हणूनच इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन हे आरोग्यास धोकादायक असल्याचे संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे.
अलिकडे वापरात असलेली वायफाय, ब्लुटूथ, ब्रॉडबँड इंटरनेट, मोबाईल हँडसेट आणि नवीन ‘फोर जी’ तंत्रज्ञानासारखी वायरलेस उपकरणात चुंबकीय विकिरणांचाच वापर होतो. त्याचा अतिवापर लहान मुले, गर्भवती, तसेच मोठय़ा माणसांनाही धोकादायक आहे. प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
 केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने १ ऑगस्ट २०१३ ला मोबाईल टॉवर उभारण्यासंबंधी काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार चुंबकीय विकिरणांच्या जास्त उत्सर्जनावर र्निबध घालण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी टॉवर्स उभारला जातो त्या मालकांचे ना हरकत प्रमाणपत्र, महापालिकेची मंजुरी, इमारतीच्या मजबुतीचे प्रमाणपत्र, आगप्रतिबंधक प्रमाणपत्र, विकिरण उत्सर्जन नियंत्रित असल्याचे प्रमाणपत्र, टॉवर्सची उंची २० ते ५५ मीटर ठेवणे, टॉवर्समधील अंतर व उभारणी नियमाप्रमाणे करणे आदी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ९०० टऌ९ फ्रिक्वेन्सीकरिता ०.४५ ६ं३३/े2, १८०० टऌ९ फ्रिक्वेन्सीकरिता ०.९ ६ं३३/े2, आणि २१०० किंवा जास्त टऌ९ फ्रिक्वेन्सीकरिता १ ६ं३३/े2  चुंबकीय विकिरणांची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने अंमलात आणलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या संभाव्य नियमानुसार आता शाळा, रुग्णालय, वृद्धाश्रम, बालगृहांच्या १०० मीटर परिसरात किंवा रहिवासी इमारतींवर मोबाईल टॉवर्स उभारू नये, असे सुचविण्यात आले आहे. तसेच, घरमालकांच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय ७० टक्के शेजारी रहिवाशांचे नाहरकत पत्र असावे, असेही सुचविले आहे.
 ग्रीन प्लॅनेट सोसायटीनेही १२ जून २०११ ला राज्य व केंद्र शासनाला पत्र लिहून मोबाईल टॉवर्सच्या विकिरणांचा आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्यामुळे कडक र्निबध घालण्याचे सुचविले होते. मात्र, राज्य व केंद्र शासनाने अजूनही यावर ठोस भूमिका घेतलेली नाही. दुसरीकडे, युरोपसारख्या देशात लहान मुले व स्त्रियांवर वायरलेस उपकरणांचा झालेला दुष्परिणाम बघता, त्यांना ही उपकरणे वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4g radiation dangers for brain
First published on: 30-06-2014 at 02:11 IST