गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असणाऱ्या गोदरेज अँड बॉयसने घर आणि संस्था यांमधील भारतातील आघाडीचा फर्निचर ब्रँड असणाऱ्या गोदरेज इंटेरिओ या आपल्या व्यवसाय शाखेने केलेल्या ‘द रिअल वर्ल्ड रीपर्कशन्स ऑफ व्हर्च्युअल फटिग’ या वैशिष्ट्यपूर्ण संशोधनातील निष्कर्ष जाहीर केले. कर्मचाऱ्यांचे काम व्हर्च्युअलीच चालू असल्यामुळे त्यांना ज्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे ती समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी गोदरेज इंटेरिओच्या वर्कस्पेस आणि एर्गोनॉमिक्स संशोधन विभागाने राष्ट्रीय पातळीवर एक संशोधन अभ्यास केला. एकूण २३५ कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी या संशोधनात भाग घेतला. त्यापैकी ६८% कर्मचारी २६-४० या वयोगटातील होते. त्यापैकी बहुतांश जण बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आणि भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत आहेत.

समस्यांची कारणं काय?

सर्व्हेनुसार, व्हर्च्युअल फटीग याची व्याख्या म्हणजे वाढत जाणाऱ्या व्हर्च्युअल कॉलमुळे जाणवणारा थकवा. सततच्या स्क्रीनमुळे येणारा व्हिज्युअल थकवा, कानांना जाणवणारा थकवा, एकूणच शारीरिक थकवा आणि मानसिक थकवा या सगळ्याचा व्हर्च्युअल फटीग मध्ये अंतर्भाव होतो. व्हर्च्युअल बैठकांमध्ये अनियमीत सहभागामुळे आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ होत आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या बैठकांसाठी एका जागेवर खूप वेळ बसून राहण्यामुळेही अंगदुखीत वाढ होत आहे. हा व्हर्च्युअल फटीगचाच परिणाम आहे. स्थिर बसून राहणे किंवा व्हर्च्युअल कॉलच्या दरम्यान पुढे, खाली वाकून बोलणे यासारख्या कामकाज पद्धतीमुळे एकूणच शारीरिक थकवा जाणवत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय सांगतो अभ्यास?

संशोधन अभ्यासानुसार, ही बाब उघड झाली आहे की गेल्या वर्षीपासून साधारण ४६% कर्मचारी घरून काम करत आहेत. महामारीला सुरुवात झाल्यानंतर आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये लॅपटॉप आणि मोबाईल फोन यांची भूमिका खूपच महत्वाची राहिली आहे. त्यामुळे स्क्रीन समोरच्या वेळेत खूप वाढ झाली आहे. या अभ्यासातून हे उघड झाले आहे की भारतातील काम करणाऱ्यांपैकी जवळपास ७२% लोक कामाची डेडलाईन गाठण्यासाठी दिवसाला ९ हून अधिक तास संगणक वा लॅपटॉप समोर घालवतात. जोडीला, ३५% प्रतिसादकांनी हे कबूल केले की नेहमीच्या कामाच्या दिवशी ते एकापाठोपाठ एक अशा २० हून अधिक व्हर्च्युअल कॉलवर उपस्थित असतात. त्याहीपुढे जाऊन ४१% कर्मचाऱ्यांनी प्रदीर्घ व्हर्च्युअल कॉलनंतर मध्यम ते अति प्रमाणात डोळ्यांची आग होत असल्याचे सांगितले. व्हिडीओ कॉल लांबल्यानंतर अंधुक दिसत असल्याचा अनुभव १९% प्रतिसादकांनी सांगितला. संशोधनातून हेही उघड झाले की ८६% कर्मचाऱ्यांना पाठीच्या मणक्यांचा त्रास जाणवत असून महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा जास्त त्रास होत असल्याचे या संशोधनातून उघड झाले आहे. २६ ते ४० वयोगटातील कर्मचाऱ्यांनी वेदनेच्या तक्रारी जास्त केल्या आहेत.