अनेक लहान मुलांना पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात हमखास सर्दी होते. सर्दीमुळे नाकातून पाणी गळत असल्याचे अनेकवेळा दिसून येते. हा आजार तसा सर्वच लहान मुलांमध्ये दिसून येतो. काही मुलांना सर्दीसोबत ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशीही लक्षणे दिसतात. अशावेळी डॉक्टरांना दाखवले पाहिजेच. पण त्याचसोबत काही घरगुती उपायामुळे वारंवार सर्दी होऊ नये, यासाठी प्रयत्न करता येतात.
अॅलोपथी उपायामुळे लगेचच बरे वाटत असले, तरी घरगुती उपाय दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरतात. आयुर्वेदातील तज्ज्ञांच्या मते हळदीमध्ये असलेल्या घटकांमुळे लहान मुलांमधील सर्दीवर उपाय करता येऊ शकतो. हळद घातलेल्या गरम दुधाचे रोज सेवन केले तरी त्याचा मुलांसाठी फायदाच होतो. अनेक गुण असल्यामुळे पूर्वीच्या काळापासून हळदीचा विविध उपचारांसाठी वापर केला जातो. भारतासोबतच चीनमध्येही हळदीचा उपयोग केला जातो.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2015 रोजी प्रकाशित
लहान मुलांमधील सर्दीवर हळदीचे दूध उपयुक्त!
काही मुलांना सर्दीसोबत ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशीही लक्षणे दिसतात
Written by विश्वनाथ गरुड

First published on: 23-09-2015 at 01:15 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A glass of turmeric milk can help cure your childs common cold