भारतातील कोणत्याही नागरिकाला स्वतःची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांक हा एक महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर केंद्र सरकारकडून भारतीय नागरिकांना जारी केला जातो. ज्यात त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फोटो सोबत त्याची बायोमेट्रिक माहिती सुद्धा आहे. जर तुम्हाला आधार कार्डवरचा फोटो आवडत नसेल तर तुम्ही तो बदलू शकता. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) ला आधार क्रमांक जारी करणे आणि व्यवस्थापित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

UIDAI नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ई-मेल पत्ता आणि फोटो बदलण्यासाठी फक्त ऑफलाइन सुविधा पुरवते. हे ऑनलाइन आणि पोस्ट द्वारे केले जाऊ शकत नाही. सोप्या शब्दात, एखादी व्यक्ती नावनोंदणी केंद्रावर जात असेल तेव्हाच फोटो अपडेट करता येईल. फोटोमध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या नावनोंदणी केंद्रात जावे लागेल किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे काम देखील करू शकता.

More Stories onफोटोPhoto
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar card update want to change the photo on aadhaar card then follow these steps ttg
First published on: 07-09-2021 at 14:54 IST