दोन दिवसांनी सप्टेंबर महिना सुरु होईल. अशातच काही राज्यांमध्ये कोविड -१९ चे रुग्ण वाढत असताना अन्य काही महत्त्वाच्या गोष्टींच्या किंमतीत बदल होत आहेत. या बदलांमध्ये आधार-पॅन जोडणी अनिवार्य ते एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत अपेक्षित वाढ समाविष्ट आहे.या बदलांचा निश्चितपणे सामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅन-आधार लिंक करणे

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की भारतीय स्टेट बँक (SBI) च्या ग्राहकांनी त्यांचा स्थायी खाते क्रमांक (PAN) त्यांच्या आधारशी ३० सप्टेंबरपर्यंत जोडणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास ग्राहकांचे विशिष्ट व्यवहार करणे बंद होईल. एका दिवसात ५०,००० किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या वेबसाइटवर त्यांचे आधार आणि पॅन लिंक करणे आवश्यक आहे.

एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती

एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीमध्ये सप्टेंबर महिन्यात वाढणार आहेत. सलग दोन महिन्यांच्या किंमती वाढल्यानंतर पुन्हा एकदा वाढ होणार आहे. १८ ऑगस्ट रोजी एलपीजीच्या किंमतीत प्रति सिलिंडर २५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती तर जुलैमध्ये ती २५.५० रुपयांनी वाढवण्यात आली होती.

आधार-पीएफ लिंकिंग

सप्टेंबर महिन्यापासून, जर तुमचा यूएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमचा नियोक्ता तुमच्या भविष्य निधी (पीएफ) खात्यात कोणतेही पैसे जमा करू शकणार नाही. याची अंमलबजावणी करण्यासाठी, कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) सामाजिक सुरक्षा संहिता २०२० च्या कलम १४२ मध्ये सुधारणा केली होती.

GSTR-1 फाइलिंग मार्गदर्शक तत्त्वे

सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (जीएसटीएन) ने म्हटले आहे की जीएसटीआर -१ भरण्यासाठी केंद्रीय जीएसटी नियमांचा नियम -५९ (६) लागू होईल. नियमानुसार, जीएसटीआर -३ बी फॉर्ममध्ये रिटर्न दाखल न केलेल्या कोणत्याही नोंदणीकृत व्यक्तीला जीएसटीआर -१ फॉर्म भरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

चेक क्लिअरन्स

रिझर्व्ह बँकेच्या पॉझिटिव्ह पे सिस्टीमचा उद्देश फसवणुकीच्या कोणत्याही कृत्याला आळा घालण्यासाठी जारीकर्त्याच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी चेक क्लिअर करणे होते. ही प्रणाली १ जानेवारीपासून लागू झाली होती.अनेक बँकांनी आधीच नवीन प्रणाली स्वीकारली आहे, Axis बँक ही १ सप्टेंबरपासून ही प्रणाली लागू करेल.

More Stories onएलपीजीLPG
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar pf seeding lpg price and gst will have changes from september 1 ttg
First published on: 30-08-2021 at 11:56 IST