करोना व्हायरसविरोधातील लढ्यासाठी केंद्र सरकारने लॉन्च केलेल्या Aarogya Setu अ‍ॅपने धमाल केली आहे. दोन एप्रिलला लॉन्च झाल्यापासून काही आठवड्यांमध्येच या अ‍ॅपचे युजर्स तब्बल 9 कोटींहून अधिक झाले आहेत. यासोबतच जगातील ‘टॉप 10 डाउनलोड’ म्हणजेच सर्वाधिक डाउनलोड झालेल्या अ‍ॅप्सच्या यादीमध्ये Aarogya Setu सातव्या स्थानावर पोहोचले आहे. Sensor Tower ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2020 मध्ये जगभरात सर्वाधिक डाउनलोड झालेल्या अ‍ॅप्सच्या यादीत Aarogya Setu सातव्या स्थानावर पोहोचले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही आकडेवारी केवळ एप्रिल महिन्यात कोणते अ‍ॅप किती युजरने डाउनलोड केले याबाबत आहे. Sensor Tower च्या रिपोर्टनुसार, एप्रिल महिन्यातील डाउनलोडींगच्या आकडेवारीनुसार नीती आयोगाचे Aarogya Setu अ‍ॅप सातव्या क्रमांकावर आहे. एप्रिल महिन्यात डाउनलोडिंगच्या बाबतीत आरोग्य सेतून लोकप्रिय व्हिडिओ अ‍ॅप नेटफ्लिक्सलाही मागे टाकले. तर, झूम, टिकटॉक, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि मेसेंजर हे टॉप सहा अ‍ॅप्स ठरले आहेत. दरम्यान, ओव्हरऑल डाउनलोड्समध्ये सातव्या स्थानावर असलेले Aarogya Setu फक्त ‘गुगल प्ले डाउनलोड्स’च्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. तर, झूम, टिकटॉक, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप हे टॉप ४ अ‍ॅप्स आहेत. खालील फोटोमध्ये तुम्ही पूर्ण यादी पाहू शकता.

(छाया सौजन्य – Sensor Tower)

आरोग्य सेतू अ‍ॅप करोना व्हायरसच्या धोक्यापासून युजरला अलर्ट करतं. हे अ‍ॅप संपर्क ट्रेसिंगद्वारे आणि युजर्सच्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे त्याच्याभोवती करोना संक्रमित असेल तर त्याची माहिती देते. याशिवाय या साथीच्या आजाराशी संबंधित बरीच महत्त्वाची माहितीही दिली जाते. करोना संसर्गापासून बचाव आणि लक्षणांचीही माहिती मिळते.  हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. दरम्यान, सरकारकडून सर्व खासगी आणि सरकारी कर्माचाऱ्यांसाठी या अ‍ॅपचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarogya setu becomes worlds 7th most downloaded app in april sas
First published on: 08-05-2020 at 14:23 IST