एखाद्याला चिरतारुण्याचा आशीर्वाद लाभणे म्हणजे काय असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे साडी. पिढय़ा बदलल्या पण साडय़ांची मोहिनी अजूनही कायमच आहे. अर्थात प्रत्येक वेळी काळाला साजेसे बदल तिला स्वत:मध्ये करता आले म्हणूनच. त्यामुळेच तर कपाटातील ठेवणीतल्या पारंपरिक साडय़ा जितक्या प्रिय असतात आणि बाजारातील चकचकीत शोरूममधील फॅन्सी साडय़ासुद्धा आपले लक्ष वेधून घेतात. यंदाचा लग्नाचा मौसम लक्षात घेता फॅन्सी साडय़ांचे नवे प्रकार बाजारात दाखल झाले आहेत.

साडय़ांचे प्रकार, त्यातील विविधता यांच्याबाबत बोलायचे ठरवले, तर हाताची बोटे कमी पडतील. प्रत्येक निमित्तानुसार साडी प्रकार बदलतात. भारतातील जवळपास प्रत्येक राज्यानुसार साडीचे प्रकार बदलत जातात. त्यातही लग्नाच्या साडय़ांचा थाट औरच असतो. अगदी वधूच्या भरजरी बनारसी शालूपासून पाहुण्यांच्या साडय़ांपर्यंत प्रत्येक साडीचे वर्गीकरण करायचे झाले, तर एकाच लग्नात वेगवेगळ्या प्रकारच्या साडय़ांचा एक फॅशन शो सहज होऊ शकतो. त्यातही पारंपरिक साडय़ांसोबतच लेटेस्ट यादीत नव्याने दाखल झालेल्या फॅन्सी साडय़ासुद्धा भाव खाऊन जातात.

Big fluctuations in the shares of two private sector banks in the capital market
बँकांच्या भागधारकांना अनोखी अनुभूती; कुणा वाट्याला आनंद, कुणा पदरी दुःख!
Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Brazil Supreme Court judge wants to investigate Elon Musk and X
एलॉन मस्क यांची ‘या’ देशात होणार चौकशी? काय आहे प्रकरण?

नाही म्हणता, नव्या फॅन्सी साडय़ांची अवस्था ही घरातील सावत्र भावंडांसारखी असते. त्या प्रत्येकाच लक्ष वेधून तर घेतातच, पण तरीही त्यांच्या नावाने नाके मुरडली जातात. त्यातही साडी गाऊनसारख्या प्रकाराला साडी म्हणावे की नाही, यावर वादविवाद आहेच. पण म्हणून त्यांची मागणी कमी होते असे मुळीच नाही.

यंदाच्या फॅन्सी साडय़ांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांचा सुटसुटीतपणा. भरजरी एम्ब्रॉयडरी केलेल्या, जड वजनाच्या साडय़ा मध्यंतरी पसंत केल्या जायच्या. एखाद्या कार्यक्रमाला जायचे म्हणजे प्रवास, कार्यक्रमातील धावपळ  लक्षात घेता या जड वजनाच्या साडय़ा मागे पडू लागल्या. अगदी लग्नात नववधूसुद्धा भरजरी शालूपेक्षा फॅन्सी साडय़ांना पसंती देऊ लागल्या आहेत.

कॉम्बिनेशन साडी

साडीचा पदर, एम्ब्रॉयडरी, रंग, िपट्र्स यांच्यासोबतच व्यवस्थित खोचलेल्या निऱ्यासुद्धा लक्ष वेधून घेतात. त्यामुळे या निऱ्यांना फोकसमध्ये आणले जात आहे. संपूर्ण साडी एका रंगाची आणि फक्त निऱ्यांचा भाग कॉन्ट्रास्ट रंगाचा अशी साडय़ांची विभागणी केलेली सध्या पाहायला मिळते. या छोटय़ाशा बदलामुळे साडीवर भरजरी काम केलेले नसले तरी तरी उठून दिसते. शिफॉन, जॉर्जेट, लेस, क्रेप सिल्कसारख्या सुळसुळीत कापडाच्या साडय़ा या प्रकारात खुलून दिसतात.

वर्क किंवा दोन वेगवेगळ्या रंगांचा वापर करून साडीचे विभाजन करायची पद्धत तशी फॅन्सी साडय़ांमध्ये बरीच लोकप्रिय आहे. मध्यंतरी एकाच कापडाच्या पण कॉन्ट्रास्ट रंगांनी विभाजन करून कॉम्बिनेशन केलेल्या साडय़ा प्रसिद्ध होत्या. सध्या एकाच रंगाच्या पण वेगवेगळे कापड वापरलेल्या साडय़ा पाहायला मिळत आहेत. साडीच्या एका भागावर क्रेप, सिल्क, वेल्व्हेट या प्रकारातील अपारदर्शी कापड आणि दुसऱ्या भागावर लेस, नेट, शिफॉन, जॉर्जेट असे पारदर्शी कापड वापरले जाते. अपारदर्शी कापडांना तुलनेने थोडे वजन असते, त्यामुळे साडय़ांचा हा भाग सिंपल ठेवला जातो आणि अपारदर्शी कापडावर नाजूक काम किंवा बॉर्डरवर्क करून त्यांना उठाव दिला जातो. त्यामुळे साडीच्या दोन्ही कापडांच्या वजनातील समतोल साधला जातो.

जॅकेट, केप

साडय़ांचा विषय चालू असताना जॅकेट, केप यांच्याबद्दल बोलणे हे खरे तर विचित्रच. पण सध्या साडीसोबत यांनाही महत्त्व दिले जात आहे. थंडीच्या मौसमात एखाद्या लग्नाला साडी नेसून जायचे असेल, तर उबदारपणासाठी एखादी शाल घेतली जाते. त्याऐवजी हे हटके प्रकार नक्कीच ट्राय करता येतील. नेहमीचा ब्लाऊज वापरण्याऐवजी एम्ब्रॉयडर जॅकेटचा वापर हल्ली केला जातोय. लांब जॅकेट आणि त्यावरून घेतलेला पदर हा साडीला रिच लुक देतो. सध्या केप जॅकेटला पर्याय म्हणून वापरले जाऊ लागले आहेत. वजनाला हलके, सुटसुटीत केप घालून वावरणेसुद्धा सोप्पे असते. साडीमध्येसुद्धा ब्लाऊज सिम्पल ठेवून साडीवरून केप घेतला जातोय. शक्यतो लेस, नेटसारख्या पारदर्शी कापडाचा केप यासाठी वापरतात. त्यामुळे साडी झाकली जात नाही.

ट्विस्टेड साडी

साडी गाऊन आणि स्टिच्ड साडीचा ट्रेंड सध्या बऱ्यापकी रुळला आहे. यातील नवा प्रकार म्हणजे हल्ली गाऊनलासुद्धा साडीप्रमाणे निऱ्या आणि पदराची जोड दिलेली असते. साडीमधल्या परकरची जागा आता लेिगग आणि घेरेदार लेहेंग्याने घेतली आहे. त्यामुळे कॅनकॅन घालून फुलविलेला लेहेंगा आणि त्यावर पदर हा साडी-लेहेंगाचा प्रकार सध्या रिसेप्शनसाठी वापरला जातो. तसेच परकरऐवजी लेिगग वापरून साडीला धोतीप्रमाणे ड्रेिपग केले जाते.

लांब पदराच्या साडय़ा

सध्या बाजारातील फॅन्सी साडय़ांमधली आवर्जून लक्षात येणारी बाब म्हणजे त्यांचे लांब पदर. साडीची लांबी किंचित जास्त ठेवत पायघोळ पदर ठेवण्याकडे हल्ली डिझायनर पसंती देऊ लागले आहेत. अर्थात हा लांब पदर नुसता सुटा ठेवण्यापेक्षा त्याला वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेपसुद्धा केले जाते. पदर मागच्या बाजूने दुसऱ्या खांद्यावर घेऊन पिनअप करणे, दुपट्टय़ाप्रमाणे हातात घेणे, स्कार्फप्रमाणे गळ्याभोवती गुंडाळणे असे वेगवेगळे प्रकार या पदरासोबत करता येतात. त्यामुळे अशा साडय़ांमध्ये साडीवरच्या वर्कपेक्षा तिच्या नेसण्याच्या पद्धतीला जास्त महत्त्व असते.

खांद्यावर वर्क केलेल्या साडय़ा

आपल्याकडे बहुतेक साडय़ांच्या पदरावर वर्क केलेले असते. त्यामुळे पदर साहजिकच फोकसमध्ये येतो. पण पदराला उठाव मिळायला हवा असेल, तर तो खांद्यावर व्यवस्थितपणे बसणे गरजेचे असते. एरवी पदर खांद्यावरून घेतल्यावर त्याला ब्रोच किंवा आतल्या बाजूने पिन लावून सोडले जाते. पण हल्ली साडीच्या खांद्यावरच्या भागावर जास्त लक्ष दिले जात आहे. त्यासाठी संपूर्ण साडी प्लेन ठेवून फक्त खांद्यावरच्या भागावर एम्ब्रॉयडरी वर्क करण्याचा प्रयोग होते आहे. या प्रकारात साडीचा पदराचा भाग शिवून दिलेला असतो. त्यामुळे पदर सांभाळायची कसरतसुद्धा वाचते. संपूर्ण साडी सिम्पल ठेवल्यामुळे बऱ्याचदा या साडय़ांमध्ये ब्लाऊजच्या पॅटर्नवरसुद्धा विशेष लक्ष दिले जाते.

कुठे मिळतील ?

ठाणे पश्चिमेला स्टेशनकडून जांभळी नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा साडय़ांसाठी प्रसिद्ध असलेली बरीच दुकाने आहेत. तिथे आवर्जून चक्कर टाका. याशिवाय ठाण्यातील गोखले रोड, राम मारुती रोड, तसेत डोंबिवलीती इंदिरा चौक, मधुबन गल्ली या भागातही फॅन्सी साडय़ांची दुकाने आहेत. हल्ली मॉलमध्येही ब्रॅण्डेड साडय़ांची दुकाने पाहायला मिळतात. फॅन्सी साडय़ांचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला इथेही मिळतील. या साडय़ांची किंमत साधारणपणे २,००० पासून सुरू होऊन लाखांच्या घरातही जाते.