जास्त प्रमाणात तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्यामुळे अनेकांना गॅस व पित्तासारख्या गोष्टींचा त्रास होतो. पोटाशी संबंधित अशा समस्या कोणालाही होऊ शकतात. आज ऊन तर उद्या पाऊस अशा वातावरणामध्ये अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनाच पोटासंदर्भातील त्रास होण्याची शक्यता असते. पोटात गॅस होणे तसेच छातीत जळजळ होणे यासारख्या समस्या तर अनेकांना आहेत. यापासून लवकरात लवकर आराम मिळावा यासाठी अनेकजण वेगवगेळ्या प्रकराची औषधं आणि गोळ्या घेत असतात. मात्र या समस्या अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाल्या आहेत. अशावेळी या समस्यांवर मात करण्यासाठी नेमकं काय केले पाहीजे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये अनेकजण आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसत नाही. अनेकदा शिळे खाद्य पदार्थ खाल्ल्याने अनेकांना पोटाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावं लागतं. कधी वेळेवर नाष्टा न करणे तर कधी दुपारचे जेवण न करणे तर कधीतरी अगदी गरजेपेक्षा जास्त खाणे, यासारख्या गोष्टी आपल्यापैकी अनेकजण करतात. त्यामुळे पोटात बिघाड होतो आणि ज्यामुळे पोटातून आवाज येणे, गॅस तसेच अ‍ॅसिटीडीसारख्या समस्या होतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acidity and stomach gas problem home remedies akp
First published on: 07-09-2020 at 19:07 IST