काही दिवसांपूर्वी देशातील सर्व मोबाईल कंपन्यांनी आपल्या मोबाईल पॅकच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच या दरांमध्ये वाढ केल्यानंतर कंपन्यांनी केवळ आपल्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सेवा देण्याची घोषणा केली होती. तसंच अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी फेअर युसेज पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. पंरतु ग्राहकांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे अखेर सर्व कंपन्यांनी हा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर आता एअरटेलनं देशात व्हायफायवर आधारित व्हॉईस कॉलिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या केवळ दिल्ली एनसीआरमधील एअरटेलच्या ग्राहकांना या नव्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. कालांतरानं संपूर्ण देशभरात ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. सुरुवातीला काही निवडक मोबाईलवर या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना एअरटेलच्या वेबसाईटवरून हँडसेटबाबत माहिती घेता येणार आहे. अॅपल, शाओमी आणि सॅमसंगच्या काही मोबाईलवर ही सुविधा वापरता येणार आहे.

आणखी वाचा- WhatsApp कॉलिंग करणाऱ्यांसाठी खुशखबर, आलं नवं फीचर ; पण…

आयफोन ६, आयफोन एसई आणि त्यावरील मोबाईलवर ही सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर शाओमी पोको एफ १, शाओमी रेडमी के २०, शाओमी रेडमी के२० प्रो, सॅमसंग जे ६, गॅलक्सी एम ३०, गॅलक्सी ए १० या मोबाईलवरही ही सुविधा उपलब्ध असेल. यासाठी ग्राहकांना प्रथम आपल्या मोबाईलचा ओएस अपडेट करावा लागणार आहे. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन व्हायफाय कॉल अनेबल करावं लागेल. एक्स्ट्रिम फायबर होम ब्रॉडबँड सेवेबरोबरच व्हायफाय कॉलिंगची ही सुविधा वापरता येणार आहे. लवकरच सर्व प्रकारच्या ब्रॉडबँडवरही ही सेवा सुर करणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel launches new wifi calling services for customers free of cost jud
First published on: 11-12-2019 at 14:31 IST