देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना नववर्षाचं जबरदस्त गिफ्ट दिलंय. कंपनीने 1 जानेवारीपासून देशात सर्व नेटवर्कसाठी पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विनामूल्य केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिओने IUC म्हणजेच Interconnect Usage Charges पूर्णपणे बंद केले आहेत. त्यामुळे जिओ ग्राहकांना आता 1 जानेवारीपासून कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंग करता येणार आहे. रिलायन्स जिओने गुरुवारी याबाबत माहिती दिली. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (TRAI) निर्देशानुसार, देशात १ जानेवारी २०२१ पासून Bill and Keep नियम लागू होणार आहे. त्यामुळे IUC चार्ज संपणार आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये IUC चार्ज आकारायला सुरूवात केल्यानंतर जिओने ज्यावेळी ट्राय IUC चार्ज संपवेल तेव्हा आम्हीही युजर्सकडून IUC चार्ज आकारणार नाही असं स्पष्ट केलं होतं. आता ट्रायने १ जानेवारीपासून IUC चार्ज न आकारण्याचं जाहीर केलंय, त्यानुसार जिओनेही ग्राहकांना पुन्हा एकदा विनामुल्य कॉलिंगची सेवा मिळेल असं स्पष्ट केलं.


सध्या जिओकडून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी IUC चार्ज आकारला जातो. यासाठी जिओ दर मिनिटाला 14 पैसे आकारत होती, नंतर 7 पैसे आकारले जात होते. पण आता हा चार्ज हटवण्यात आला असून विनाशुल्क कॉलिंग 1 जानेवारीपासून करता येणार आहे.

(1500 टॉवर्सची तोडफोड, Jio ने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र; हस्तक्षेप करण्याची मागणी)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All reliance jio voice calls to any network in india to be free check details sas
First published on: 31-12-2020 at 14:44 IST