मे महिन्यात झालेल्या फेसबुक ‘एफ८ कॉन्फरन्स’मध्ये फेसबुकनं व्हॉट्स अॅपवर लवकरच ग्रुप व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय उपलब्ध होईल अशी माहिती दिली होती. आता व्हॉट्स अॅपचे ग्रुप व्हिडिओ कॉलिंग फीचर लाइव्ह झालं असूनही आता आपणही ग्रुप व्हिडिओ कॉल करू शकणार आहोत. अनेक स्मार्टफोनमध्ये व्हॉट्स अॅप अपडेट केल्यानंतर ग्रुप व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय दिसू लागला आहे. व्हॉट्स अॅपनं आणलेल्या या नव्या पर्यायाचा वापर कसा करायचा हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. व्हॉटस अॅप ग्रुप व्हिडिओ कॉलिंग हे फक्त अमुक एका व्हॉट्स अॅप ग्रुपमधल्या लोकांना जोडण्यासाठी तयार करण्यात आलं आहे असा जर तुमचा समज असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण युजर्सचे व्हॉट्स अॅप ग्रुप आणि या फिचर्सचा काहीही संबंध नाही त्यामुळे तुम्हाला ग्रुप कॉलिंग करायचं असेल तर त्याची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी असणार आहे.
२. ग्रुप व्हिडिओ कॉलिंगमध्ये फक्त चार युजर्सच एका वेळी बोलू शकणार आहेत.
३. चार जणांचा ग्रुप पूर्ण झाल्यानंतर पाचवा कॉल युजर्सना करता येणार नाही.
४. एखाद्या युजरनं फोन उचलल्यानंतरच मग पुढील युजर्सना ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये अॅड करता येणार आहे.
५. चॅट विंडोच्या उजव्या बाजूला सर्वात वर ग्रुप व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All you need to know how to use whatsapp group video calling feature
First published on: 20-06-2018 at 17:29 IST