टॅबलेटवर गाणे ऐकण्यामुळे तसेच अनेक कलांच्या माध्यमातून स्मृतिभंरश झालेल्या रुग्णांना मोठा फायदा होत असल्याचे एका भारतीय संशोधकाने म्हटले आहे. स्मृतिभंरश साधारणपणे वृद्धांमध्ये दिसून येतो. खूप वेळ चिंता करीत राहणे, भीती आणि सततचा ताण स्मृतिभ्रंश होण्यास कारणीभूत आहे. मात्र यावर उपाय म्हणून टॅबलेटसारखी उपकरणे वापरल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येते. आणि ही एक सुरक्षित आणि उपयुक्त अशी उपचारपद्धती असल्याचे अमेरिकेतील मॅकलीन रुग्णालयातील लिप्सीत वाहिया यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राथमिक टप्प्यामध्ये टॅबलेटचा वापर करून गाणे तसेच इतर मानसिक आरोग्यावरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध अ‍ॅपचा वापर केल्यास त्याचा रुग्णांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले. ही अ‍ॅप विकसित करणाऱ्या विकासकांनी या लोकांसाठी अधिक विकसित तंत्रज्ञान आणण्याची गरज असल्याचे या संशोधनाचे प्रमुख असलेल्या वाहिया यांनी म्हटले आहे.

विविध कला, गाणे ऐकणे आणि इतर समांतर उपचारपद्धतींमुळे औषधोपचार न घेता रुग्णांमध्ये सुधारणा दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. टॅबलेटचा वापर या उपचारपद्धतीसाठी फायदेशीर ठरत असून, रुग्णांना संगणकीय ज्ञान वाढवण्यासाठीही याचा फायदा होत असल्याचे यातून दिसून आले. संशोधकांनी या वेळी अभ्यास करण्यासाठी टॅबलेटमध्ये ७१ पेक्षा अधिक अ‍ॅपचा समावेश केला होता. यामध्ये मानसिक सुधारणा होण्यासाठी फोटो काढणे ते सुडोकू कोडी यांसारख्या अनेक अ‍ॅपचा समावेश करण्यात आला होता.

टॅबलेट हा या रुग्णांसाठी सर्वात सुरक्षित असल्याचे अभ्यासात दिसून आले. तसेच त्यांना या वेळी ते कसे वापरायचे याचे प्रशिक्षणही देण्यात येत होते. उदा. काही रुग्णांना यूटय़ूबवर व्हिडीओ दाखविण्यात आले, त्याचा रुग्णांवर सकारात्मक प्रभाव पडल्याचे वाहिया यांनी सांगितले. हे संशोधन अमेरिकेच्या मनोदोषचिकित्सा नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alzheimers disease
First published on: 09-01-2017 at 01:15 IST