ई-कॉमर्स कंपनी Amazon ने आपल्या प्राइम व्हिडीओच्या सर्च, नेव्हिगेशन आणि कस्टमर सपोर्टच्या युजर इंटरफेसमध्ये (यूआय) हिंदी भाषेचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. याद्वारे अजून 10 कोटी युजर्स आपल्या प्राइम मेंबरशीपमध्ये जोडण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. हिंदी भाषेचा सपोर्ट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ अॅप आणि प्राइमव्हिडीओ डॉट कॉमवर उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या ग्राहकांना प्राइम व्हिडीओमध्ये हिंदी भाषेचा पर्याय निवडायचा असेन ते सेटिंगमध्ये जाऊन हा पर्याय निवडू शकतात. ‘स्थानीक भाषांमध्ये केवळ कंटेंट उपलब्ध करणंच महत्त्वाचं नाहीये, तर अॅप आणि संकेतस्थळावरही युजर्सच्या आवडीच्या भाषेचा पर्याय देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. प्राइम व्हिडीओ हिंदीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आम्हाला आनंद होतोय, यामुळे ग्राहक आमच्या सेवांचा अधिक योग्यरित्या वापर करु शकतील’, असं अॅमेझॉन इंडियाचे बिझनेस संचालक आणि प्रमुख गौरव गांधी म्हणाले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon prime video now in hindi
First published on: 14-11-2018 at 11:13 IST