तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला असेल तर तो परत मिळवण्यासाठी अनेक अॅप उपलब्ध आहेत, पण लॅपटॉप किंवा अन्य कोणतं उपकरण हरवल्यावर ते परत मिळवण्यासाठी खूप कमी पर्याय आहेत. मात्र, आता काळजी करण्याची गरज नाही, कारण डिजीटेक कंपनीने ‘अॅन्टी लॉस्ट वायरलेस ट्रॅकर’ हे नवं गॅजेट लॉन्च केलं आहे. ५९५ रुपयांच्या या गॅजेटच्या सहाय्याने केवळ लॅपटॉपच नाही तर हरवलेल्या अनेक वस्तू शोधणं अगदी सहजसोपं होणार आहे. या गॅजेटचा वापर करण्यासाठी तुम्हाला केवळ ‘डिजीटेक ट्रॅकर’ नावाचं एक अॅप डाउनलोड करावं लागणार आहे. प्ले स्टोअरवर आणि अॅपल स्टोअरवर हे अॅप सहज उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अॅन्टी लॉस्ट वायरलेस ट्रॅकर’ हे तीन डिझाइनमध्ये आणि दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे गॅजेट ‘डिजीटेक ट्रॅकर’ या अॅपसोबत पेअर केल्यानंतर कोणत्याही वस्तूवर लावून त्याचा वापर करता येईल. गॅजेटला ब्ल्यूटुथची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. त्यामुळे अॅपद्वारे हे गॅजेट किती अंतरावर आहे, याची माहिती तुम्हाला सहज मिळेल. गॅजेटसोबत एक्स्ट्रा बॅटरी देखील देण्यात आली आहे.

या गॅजेटचा वापर लॅपटॉपव्यतिरिक्त कार, सायकल किंवा अन्य अनेक वस्तू शोधण्यासाठी करता येईल. कमाल ३० मीटरपर्यंतच्या रेंजमध्ये हे गॅजेट काम करतं. जर तुमची वस्तू रेंजच्या बाहेर चालली असेल तर लगेच तुमच्या फोनमध्ये अलार्म वाजायला सुरूवात होईल. फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठीही या गॅजेटचा वापर करता येतो. यासाठी युजरने डिजीटेक ट्रॅकरवर दिलेलं एक बटन सुरू करण्याची गरज आहे.
अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील किंवा शॉपक्लूज यांसारख्या शॉपिंग वेबसाइटवरुन हे गॅजेट खरेदी करता येईल, याशिवाय दुकांनांमध्येही तुम्हाला हे गॅजेट खरेदी करता येऊ शकतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti lost wireless tracker device will help you track lost laptops or other gadgets
First published on: 07-06-2018 at 11:00 IST