अॅपलने सोमवारी अॅपल २०२१ च्या कार्यक्रमात अनेक नवीन उत्पादनांची घोषणा केली. त्यापैकी विशेषतः नवीन मॅकबुक प्रो लॅपटॉप जे बीफियर एम १ प्रो आणि एम १ मॅक्स प्रोसेसर आणि अपडेटेड डिझाइनसह आले आहेत. याशिवाय कंपनीने नवीन एअरपॉड्स, नवीन स्पीकर्स आणि अॅपल म्युझिकची नवीन योजना सादर केली आहे. यासह, कंपनीने नवीन प्रोसेसरपासून पडदाही उठवला आहे. या उत्पादनांबद्दल जाणून घेऊयात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅकबुक प्रो २०२१ किंमत आणि वैशिष्ट्ये

अॅपलने नवीन मॅकबुक प्रो २०२१ चे अनावरण केले आहे. जे १४-इंच आणि १६-इंच अशा दोन स्क्रीन मध्ये तुम्हाला घेता येणार आहे. तसेच कंपनीने दोन्ही मॅकबूक प्रो ची प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध केली आहेत. हे दोन्ही लॅपटॉप अॅपलच्या ऑनलाइन स्टोअरवरून मागवले जाऊ शकतात आणि त्यांची विक्री २६ ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर १४-इंच मॅकबुक प्रो ५१२ जिबी (GB) ची किंमत १,९४,९०० इतकी रुपये आहे, तर M1 Pro 1TB वर्जनची किंमत २,३९,९०० रुपये इतकी आहे. तर १६-इंच मॅकबुक प्रो ची किंमत भारतात M1 Pro ५१२ जिबीसाठी २,३९,९०० रुपये आहे, तर १६-इंच M1 Pro 1TB ची किंमत २,५९,९०० रुपये इतकी असून M1 Max 1TB या वर्जनची किंमत ३,२९,९०० रुपये इतकी आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple launches new product macbook pro airpods 3rd gen learn features and prices scsm
First published on: 19-10-2021 at 16:07 IST