एका संशोधनानुसार असे लक्षात आले की भारतात तीन कोटी साठ लाख लोक ऑस्टियोपोरोसिस या आजाराशी झुंज देत आहेत. ऑस्टियोपोरोसिसचे वैशिष्ट्य म्हणजे हाडांना येणारा ठिसूळपणा. हा एक प्रकारचा हाडांचा आजार असून या आजारात हाडे ठिसूळ बनतात यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियम व प्रोटीन यांची म्हणजेच ‘बोन मिनरल डेन्सिटीची’ झालेली कमतरता होय. वाढत्या वयाबरोबर हाडांमध्ये कॅल्शियम व ‘व्हिटॅमिन डी ची कमतरता होऊन ऑस्टियोपोरोसिसची सुरुवात होते. ऑस्टियोपोरोसिस हा आजार मुख्यत्वे करून स्त्रीयांना मेनोपॉजनंतर आणि वयाची साठी उलटून गेलेल्या पुरूषांमध्ये दिसून येतो. ऑस्टियोपोरोसिसचा सर्वात जास्त परिणाम पाठीचा कणा, खुबा व मनगटाची हाडे यांवर होतो.

ऑस्टियोपोरोसिस झालेल्या ५० टक्के महिलांमध्ये विटॅमिन ‘डी’ची कमतरता दिसून येते. तर जागतिक स्वास्थ संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात पन्नाशीत असणाऱ्या २ पैकी १ स्त्रीमध्ये या रोगाची लक्षणे आढळतात.या आजाराचा विशेषतः स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त धोका आहे.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर

ऑस्टियोपोरोसिस म्हणजेच कॅल्शियम व विटॅमिन ‘डी’ ची कमतरता, हार्मोन्स मधील बदल व असंतुलन होय. हाडे बळकट करण्यासाठी शरीर कॅल्शियम व फॉस्फेटचा वापर करते. आहारात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसल्यास हाडे ठिसूळ बनतात. वयाच्या ४० व्या वर्षानंतर जेवणात कॅल्शियम योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे कारण याच काळामध्ये हाडांची झीज मोठ्या प्रमाणात होत असते. कॅल्शियम बरोबरच आहारात प्रोटीनचा समावेश तितकाच महत्वाचा आहे कारण प्रोटीनच्या कमतेरमुळे हाडे ठिसूळ होतात.

ऑस्टियोपोरोसिस या आजाराचे दोन प्रकार आहेत.
टाईप १ : पहिला प्रकार हा महिलांमध्ये आढळून येतो विशेषतः मेनोपॉज नंतर.
टाईप २: साधारणपणे जेष्ठ नागरिक या आजाराचे बळी ठरतात.

ऑस्टियोपोरोसिस म्हणजे काय?

ओस्टियोब्लास्ट आपल्या शरीरात ब्लॉक ची निर्मिती व हाडांवर कॅल्शियमचा थर जमा करणे. तर ऑस्टियोक्लास्ट्स हे शरीराच्या आवश्यकते नुसार हाडांमधील कॅल्शियम काढून टाकण्याचे काम करते. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात ऑस्टियोबालास्ट अधिक सक्रिय असतात ज्यामुळे हाड तयार होतो. प्रौढतेमध्ये ओस्टियोबास्ट आणि ऑस्टियोक्लास्ट दोन्ही समान प्रमाणात स्थिती राखत असतात. परंतु नंतरच्या टप्प्यात संतुलन ओस्टियोक्लास्ट्सचे अधिक प्रमाणात बदलते ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिसची वाढ होते. विशेषतः महिलांमध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते.

परिणामी फ्रॅक्चर होण्याची देखील शक्यता असते. आपल्या हाडांमध्ये तीन प्रकारचे सेल्स असतात ऑस्टियोसाईट, ऑस्टियोब्लास्ट आणि ऑस्टियोक्लास्ट. ऑस्टियोब्लास्ट नवीन हाडे तयार करतात. ऑस्टियोक्लास्ट खराब झालेले हाड काढून टाकण्याचे काम करतात आणि ऑस्टिओसाईट हे राखीव असतात जे कधी ऑस्टिओब्लास्ट व कधी ऑस्टिओक्लास्ट म्हणून काम करतात. जे खराब झालेले हाड ऑस्टिओक्लास्ट काढून टाकते तेव्हडेच हाड ऑस्टिओब्लास्ट परत तयार करते त्यामुळे शरीरात हाडांचा समतोल राहतो. ऑस्टिओपोरोसिस मध्ये ऑस्टिओक्लास्ट जास्त हाडे काढून टाकतात व त्याच्या तुलनेत ऑस्टिओब्लास्ट कमी प्रमाणात हाडे तयार करतात. त्यामुळे हाडांची सक्षमता कमी होते व रुग्णास त्रास होतो. यालाच ऑस्टियोपोरोसिस असे म्हटले जाते.

ऑस्टियोपोरोसिस झाला आहे हे कसे ओळखावे
बोन डेन्सिटोमेट्रो चाचणी, सिरम कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, तसेच टी ३, टी ४ टीएस, एच इस्ट्रोजन, टेस्टोटेरॉन यांसारख्या काही रक्तचाचण्याद्वारेदेखील हा आजार झाला आहे हे समजते.

बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट
बोन डेन्सिटी टेस्टसाठी एका विशेष प्रकारच्या एक्सरेचा वापर केला जातो.त्याला डीएक्सए असे म्हणतात. याद्वारे मणका माकडहाड व हातांच्या हाडांचे स्क्रीनिंग करण्यात येते. व्हर्टेब्रल कॉलम, हिप आणि मनगट सुमारे ही हाडे या चाचणीमध्ये तपासले जातात.
या भागांतील हाडांची डेन्सिटी पडताळली जाते. जेणेकरून हाडे ठिसूळ होऊन तुटण्याच्या आधी त्यांच्यावर उपचार सुरु करता येतात. महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर किंवा साधारणपणे वयाच्या पंचेचाळीशी नंतर आणि पुरुषांमध्ये 60 वर्षांच्या वयानंतर दर पाच वर्षांनी ही चाचणी घेणे आवश्यक आहे.

ऑस्टियोपोरोसिस होण्याची कारणे
ऑस्टियोपोरोसिस होण्याचे मुख्य कारण म्हणजे शारीरीक हालचालींचा अभाव होय. आपण बघतो बऱ्याचवेळा लोक तासनतास टी,व्ही समोर बसून असतात तर काही लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी खूप वेळ बसून असतात. अशावेळी त्यांच्या शरीराची पुरेशा प्रमाणात हालचाल होत नाही.म्हणून अशा लोकांमध्ये ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका जास्त असतो. हाडांचा कॅन्सर, विविध औषधांचा अतिवापर, धुम्रपान, कॅल्शियम, व्हिटॅमिनची कमतरता, थायरॉईडची समस्या व अनुवांशिकता इ कारणांमुळे देखील ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो.

ऑस्टियोपोरोसिसची लक्षणे
सुरुवातीला या रोगाची कोणतीच लक्षणे दिसून येत नाही. याचे प्रमुख लक्षण म्हणजे हाडांना असणारे फ्रॅक्चर होय. परंतु या आजाराच्या प्रभावामुळे हाडे मोडतात. प्रथमदर्शनी या आजाराची कोणतीच लक्षणे दिसत नसली तरी कमरेचा खालचा भाग व मानेचा त्रास होण्यास सुरुवात होते. हिवाळ्यामध्ये हाडांचे दुखणे वाढते, शारीरिक उर्जा निर्माण करणाऱ्या प्रक्रियेत कमतरता जाणवू लागते.

ऑस्टियोपोरोसिस थांबविण्यासाठी घ्यावयाची काळजी-
१) जीवनशैलीत बदल.
२) जेवणामध्ये कॅल्शियम, प्रोटीन व विटॅमिन ‘डी’चा प्रामुख्याने समावेश.
३) हिरव्या पालेभाज्या, डेअरी प्रोडक्ट्स व मांसाहाराचे योग्य प्रमाण
४) जेवणात पूर्ण दिवसात १५०० मिलीग्रॅम पर्यत कॅल्शियमचे सेवन
५) शरीराचे वजन प्रमाणात ठेवणे, दररोज एक मैल पायी चालणे
६) व्यायाम, योग यांच्या माध्यमातून शारीरिक हालचाल होणे आवश्यक.
७) धुम्रपान व मद्यपान कटाक्षाने टाळणे.

ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध घालणे हे उपचारांपेक्षा जास्त गरजेचे आहे. दररोज कमीत कमी ३० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. हाडांना आणि स्नायूंना बळकटी येण्यासाठी योग, एरोबिक्स यांच्यावर भर दिला पाहिजे. तसेच रोजच्या आहारात कॅल्शियम व प्रोटीनचा प्रामुख्याने समावेश केला पाहिजे. अशा रीतीने आपल्याला हाडांची यथायोग्य काळजी घेऊन ऑस्टिओपोरोसिस टाळण्यात मदत होईल.

– डॉ. नीरज आडकर, साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीचे संचालक आणि सांधेरोपणतज्ञ