Ayurvedic Remedies For Oily Skin : बदलत्या वातावरणामुळे अनेंकाची त्वचा तेलकट होते. त्वचेतील आद्रकतेचं प्रमाण कमी-जास्त होत असल्यामुळे आधिक काळजी घ्यावी लागते. आपल्या त्वचेचा पोत, रंग हे आपल्या हातात नसते. काहींची त्वचा खूप कोरडी असते तर काहींची खुप तेलकट असते. तेलकट त्वचा असणाऱ्यांचा चेहरा सतत तेलकट दिसतो. या लोकांच्या चेहऱ्याच्या त्वचेतून नैसर्गिकपणे तेल येत असल्याने चेहरा ठराविक काळाने काळवंडल्यासारखा दिसतो. सतत चेहरा धुतल्यानंतरही त्वचा तेलकट राहते. तेलकट त्वचेवर अनेक उपाय आहेत. पण नैसर्गिक आणि घरगुती उपाय तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकतात. याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. शिवाय तुमच्या चेहऱ्यावरील ग्लोही वाढेल. पाहूयात कोणते आहेत उपाय…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. कोरफड
तेलकट त्वाचेपासून सुटका करण्यासाठी कोरफड फायद्याची आहे. कोरफडीमध्ये एण्टी-इफ्लेमेट्री गुण आहेत. या गुणामुळे त्वाचला होणारं इन्फेक्शन थांबते. कोरपडीचं जेल दररोज चेहऱ्यार लावल्यानंतर तेलकटपणापासून सुटका होऊ शकते. तसेच त्वचेमध्ये असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाचा समतोल राखण्यासाठी कोरफड आणि हळद हे रामबाण उपाय ठरतात. ज्यासाठी १ टीस्पून हळद आणि कोरफडीचा गर आणि काकडीचा रस हे सर्व पदार्थ एकत्र करुन ही पेस्ट पंधरा ते वीस मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवावी आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayurvedic remedies for oily skin even after washing the face several times the skin is oily so these ayurvedic remedies will work naturally relieving nck
First published on: 10-08-2020 at 15:07 IST