कमी किंमतीमध्ये मिळणाऱ्या मोटरसायकलच्या बाबतीत Bajaj Platina भारतात बरीच लोकप्रिय आहे. कंपनीने या बाइकला आता अजून पावरफुल आणि सुरक्षित बनवलं आहे. नवी प्लॅटिना 110 cc इंजिन आणि CBS ब्रेकिंग सिस्टीमसह सादर करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी प्लॅटिना अद्याप कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध नसली तरीही डिलर्सपर्यंत ही बाइक पोहोचण्यास सुरूवात झालीये. नव्या प्लॅटिनामध्ये 115.5 सीसीचं सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं असून याद्वारे 8.5 bhp ची पावर आणि 9.8 Nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये 4-स्पीड ट्रांसमिशन देण्यात आलंय. यामध्ये CBS म्हणजे कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आलीये. बजाजने सीबीएसला एंटी-स्किड ब्रेकिंग सिस्टीम नाव देण्यात आलं आहे. या बाइकच्या दोन्ही बाजूला ड्रम ब्रेक असेल. याशिवाय पुढील बाजूला डिस्क ब्रेकचा पर्यायही उपलब्ध असेल. नव्या प्लॅटिनाच्या स्टाइलमध्ये कंपनीने कोणताही बदल केलेला नाहीये. मात्र, फ्रेश लुक दिसावं यासाठी कंपनीने यामध्ये स्पोर्टी आणि बोल्ड दिसणारे नवे बॉडी ग्राफिक्स दिलेत. बाइकच्या पुढील बाजूला टेलेस्कोपिक फोर्क्स आहे, तर मागील बाजूला नायट्रोजन शॉक अॅब्जॉर्बर आहे. याशिवाय ग्राउंड क्लिअरंस 200mm आहे. मायलेजच्या बाबतीत ही बाइक शानदार असेल असं सांगितलं जात आहे. सध्या बाजारात असलेली प्लॅटिना एका लिटर पेट्रोलमध्ये 80 किलोमिटर धावते असा अनेक ग्राहकांचा दावा आहे. कदाचित त्यामुळेच भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाइक्समध्ये या बाइकचा समावेश होत असावा. दिल्ली एक्स शोरुममध्ये 49 हजार 300 रुपये इतकी या बाइकची किंमत ठेवण्यात आलीये.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj platina 110 cbs launched know features and price
First published on: 04-12-2018 at 18:20 IST