जर तुम्ही या विकेंडला आपल्या बँकांची कामं पूर्ण करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. बँकांची कामं तुम्हाला गुरूवारपर्यंतच पूर्ण करावी लागणार आहेत. येत्या शुक्रवार आणि शनिवारी बँक कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहे. त्यामुळे बँकांचं कामकाज ठप्प होणार आहे. संपाचे दिवसही महत्त्वाचे आहेत. ३१ जानेवारी रोजी आर्थिक सर्व्हे तर १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस बँका बंद राहिल्यास कर्मचाऱ्यांचं वेतन मिळण्यासही उशिर होण्याची शक्यता आहे. तर एटीएममध्येही पैशांची कमी भासण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा बँक कर्मचारी संपावर जात आहेत. यापूर्वी ८ जानेवारी रोजी बँक कर्मचाऱ्यांच्या सहा कर्मचारी संघटनांनी सहभाग घेतला होता. या दिवशी अनेक बँकांचे कर्मचारी या संपात सहभागी झाल्यानं ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं.

काय आहे कारण ?
आपल्या अनेक मागण्यांसाठी इंडियन बँक असोसिएशनकडून संपाची हाक देण्यात आली आहे. त्यांच्या मागण्या अद्यापही मान्य करण्यात आलेले नाही. समान कामाचं समान वेतन, कामाची निर्धारित वेळ, पेन्शन अशा मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank employees on strike 31 january and 1st february for various demands jud
First published on: 28-01-2020 at 14:15 IST